AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कुणालच्या आत्याचा भावाबद्दल धक्कादायक दावा, बायकोने त्याला..

कुणाल चांदगुडे प्रकरणात मोठा खुलासा झाला. कुणालच्या आत्याने नक्की काय घडले हे सांगितले. कुणाल चांदगुडे याचे वडील मुरलीधर चांदगुडे यांच्यासोबत नक्की काय काय होत होते, हे आत्याने सांगितले. पहिल्यांदाच हा हादरवणारा खुलासा केला.

कुणालच्या आत्याचा भावाबद्दल धक्कादायक दावा, बायकोने त्याला..
Kunal Chandgude
| Updated on: Aug 23, 2026 | 5:06 PM
Share

दहावीत 92 टक्के घेणारा छत्रपती संभाजीनगर येथील 19 वर्षीय कुणाल चांदगुडे याच्या प्रकरणात एका मागून एक खुलासे होत आहेत. सुरूवातीला सांगितले गेले की, कुणाल याने आयफोनसाठी हा निर्णय घेतला. त्याचा वाद वडिलांसोबत आयफोनवरून झाला. पण त्यानंतर एका मागून एक मोठे खुलासे होत आहेत. खवड्या डोंगरावरून उडी मारून चांदगुडे कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मात्र, आता काैटुंबिक वाद पुढे आला. मुरलीधर चांदगुडे यांच्या प्रेमविवाहाला त्यांच्या आई-वडिलांचा विरोध होता. ज्यामुळे मोठ दुरावा निर्माण झाला. ते आपल्या आई वडिलांना बोलतही नव्हते. मात्र, आई वडिलांनी आपले कर्तव्य पार पाडले. त्याच्या नावावर असलेली शेती त्यांना दिली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुरलीधर चांदगुडे आपल्या कुटुंबियांना बोलत होते. आपल्या बहिणींच्या संपर्कात होते.

मुलगा कुणाल याला वाचवण्यास गेलेल्या वडील मुरलीधर चांदगुडे, आई संगीता चांदगुडे आणि मुलगा कुणाल यांच्या निधनानंतर कुणालची आत्या आणि मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणीने हादरवणारे खुलासे केले. tv9 मराठीची टीम त्यांच्या घरी पोहोचली असता मुरलीधर चांदगुडे यांच्या बहिणीने म्हटले की, ते त्यांचे त्यांचे राहत होते. आम्हाला काही वाटते नव्हते. आम्ही म्हणायचो की, साऱ्या जगातच होते, त्यांनी केले म्हणून काय झाले.

आम्ही समजून घ्यायचो आमच्या मनाला. आम्ही त्याला त्रास देत नसत. त्या पती पत्नीमध्ये वाद होत होते की नाही हे आम्हाला सांगता येणार नाही. ती आमच्यासोबत त्याला बोलू देत नव्हती. आमच्या बहिणी भावाची भेट होऊन एक दीड महिना झाले. आम्ही सर्वजण गावी आलो होतो. त्यानंतर तो बोलला नाही. म्हणजे फोनवर बोलत होता. माझ्या मुलाचे लग्न चार महिन्यापूर्वी झाले, तेव्हापासून तो बोलायला लागला. त्यानंतर त्यांनी त्याला घराबाहेर काढून दिले.

त्यांच्यासोबत राहा नाही तर आमच्यासोबत राहा असे ती म्हणाली. माझ्या भावाने म्हटले की, ते पण मला लागतात. तर मग तिने म्हटले की, मग तू त्यांच्यासोबतच राहा आमच्यासोबत नको. कुणालच्या आईने त्यांनी त्याला घराबाहेर काढून दिले होते. तो गाडी चालवायचा आणि गाडीतच झोपायचा, गाडीतच राहायचा. इकडे आई बाबांकडे यायचा आणि उभ्या उभी भेटायचा आणि जायचा. आम्ही म्हणायचे की, भाऊ तुझे भांडणे मिटून जाईल, तुम्ही गोड होताल. मी त्याला म्हणायचे की, तू तुझ्या घरी जा बाबा… त्याला समजून सांगायचे.

आम्ही त्यांना कधी काहीच म्हणलो नाही. घटनेबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. कारण त्यांचा आणि आमचा काहीच संपर्क नव्हता. आम्ही फक्त त्याच्यासोबत फोनवर संपर्कात होतो. 25 वर्ष तो आम्हाला कधी बोलला नाही. तो जाता येता दिसला तरीही आनंद झाला. त्यांचे लग्न झाल्यावर आम्ही त्यांच्या घरी एक दिवस गेलो होतो, आमचे वडील म्हणाले की, चला आपण त्या दोघांना घेऊन येऊ पण त्यांनी नाही येऊ दिले आमच्यासोबत..

Follow Us
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात