AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार यांचा हा पावर गेम होता, शिंदेच्या आमदारानं थेट अर्थच सांगितला, अजित पवार यांना डिवचत केली खोचक टीका

मी जर निर्णय घेतला तर कुणालाही अडचण होऊ शकते हे शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं आहे अशी प्रतिक्रिया देत आमदार संजय शिरसाठ यांनी थेट अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

शरद पवार यांचा हा पावर गेम होता, शिंदेच्या आमदारानं थेट अर्थच सांगितला, अजित पवार यांना डिवचत केली खोचक टीका
Image Credit source: TV9 Network
| Edited By: | Updated on: May 05, 2023 | 2:53 PM
Share

छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले होते. त्यावर संपूर्ण राज्यसह देशभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा मान्य नसल्याची भूमिका घेत शरद पवार यांनी अध्यक्षपदी राहावे अशी मागणी केली होती. त्यानंतर शरद पवार यांनी अध्यक्ष निवड समिती नेमली होती तीने निर्णय घ्यावा असा अध्यक्ष पदाचा चेंडू पवारांनी राष्ट्रावादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या कोर्टात टोलावला होता. त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या असून अध्यक्ष निवड समितीने शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनीच राहावे असा ठराव केला आहे. याच संपूर्ण घडामोडीवर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया देत अजित पवार यांना डिवचलं आहे.

आमदार संजय शिरसाठ म्हणाले, शरद पवार यांचा हा पावर गेम आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत कलह होता, त्यामुळे शरद पवार यांनी हा मास्टरस्ट्रोक दिला आहे. आता राष्ट्रवादीला नाविलाजास्तव एकत्र यावं लागणार आहे. शरद पवार यांनी हे स्पष्ट केलं आहे की, माझी ताकत म्हणजे माझी ताकत आहे. शरद पवार काहीही उलथापालथ करू शकतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

मी जर निर्णय घेतला तर कुणालाही अडचण होऊ शकते हे शरद पवार यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. अजित पवार यांच्या चलबिचलपनाला ब्रेक बसला आहे. आता शांत बसणे हा एकमेव पर्याय आहे, राष्ट्रवादीतली चलबिचल आता शांत होईल. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या मनस्थितीत नाहीत, त्यांना महाराष्ट्राची धुरा स्वतःकडे घ्यायची आहे.

अजित पवार जेव्हा बोलत होते,  तेव्हा शरद पवार यांनी त्यांना थांबवले नाही. शरद पवार यांचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाहीत पण शरद पवार यांचा काँग्रेस आणि शिवसेनेवर परिणाम होणार आहे, या प्रकरणामुळे काँग्रेस आणि शिवसेनेला सेट बॅक बसला आहे. यामुळे आता शिवसेना भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगेल.

वज्रमूठ सभा रद्द होण्याला शरद पवार हे प्रकरण कारणीभूत आहे. महाविकास आघाडीच्या सभेला मोठे नेते येणार नाहीत, त्यामुळे झाकली मूठ सव्वा लाखाची यावरून सभा रद्द झाल्याचा टोलाही आमदार संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. याशिवाय संजय शिरसाठ यांनी अजित पवार यांनाही डिवचलं आहे.

Follow Us
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर
अशोक खरात प्रकरणात नवे खुलासे; भोंदू खरातची नवीन मोडस ऑपरेंडी समोर.
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित....
आता रेशनकार्डवर मिळणार रॉकेल, पण या शहरातील ग्राहक राहणार वंचित.....
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?.
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.