AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉक्स ऑफिसनंतर 2 महिन्यांपूर्वीचा हा क्राइम-थ्रिलर चित्रपट आता OTT वर घालणार धुमाकूळ, IMDb रेटिंग 7.6

2 महिन्यापूर्वी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या या क्राइम-थ्रिलर चित्रपटाने प्रेक्षकांना 2 तास 11 मिनिटे जागेवर ठेवलं होतं खिळवून. आता ओटीटीवर होतोय प्रदर्शित.

बॉक्स ऑफिसनंतर 2 महिन्यांपूर्वीचा हा क्राइम-थ्रिलर चित्रपट आता OTT वर घालणार धुमाकूळ, IMDb रेटिंग 7.6
| Updated on: Mar 27, 2026 | 3:51 PM
Share

वर्षाच्या सुरुवातीला चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची आणि समीक्षकांकडून कौतुक करण्यात आलेला दमदार क्राइम थ्रिलर Vadh 2 आता ओटीटीवर प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. रहस्य, भावना आणि अनपेक्षित ट्विस्टने भरलेला हा चित्रपट प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवते.

थिएटरमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर ‘वध 2’ आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर येणार आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटाचं वातावरण शांत असलं तरी त्यामध्ये दडलेला सस्पेन्स प्रेक्षकांना सतत गुंतवून ठेवतो आहे.

ओटीटी रिलीजची तारीख

या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन जसपाल सिंग संधू यांनी केलं आहे. ‘वध 2’ हा 2022 मध्ये आलेल्या ‘वध’चा सिक्वेल नसून त्याच विश्वातील एक नवी कथा मांडतो. 6 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षक दोघांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हळूहळू उलगडणारी पण प्रभावी कथा आणि कलाकारांच्या दमदार अभिनयाचं कौतुक झालं.

ज्यांना हा चित्रपट थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे ‘वध 2’ 3 एप्रिल 2026 पासून Netflix वर स्ट्रीम होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता घरबसल्या हा थरार अनुभवता येणार आहे.

जेलमधील थरारक कथा

या वेळी चित्रपटाची कथा जेलच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. एका थकलेल्या जेल गार्ड आणि एका जुन्या कैद्यामधील हळूहळू निर्माण होणाऱ्या अनोख्या नात्यावर ही कथा केंद्रित आहे. दोघेही आपल्या आयुष्यातील ओझं घेऊन जगत असतात. कठोर आणि तणावपूर्ण वातावरणात त्यांच्यातील संवाद आणि समज हळूहळू वेगळं वळण घेतात, ज्यामुळे कथा अधिक रंजक बनते.

कथेतील मोठा ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा एक प्रभावशाली आणि राजकीय पाठबळ असलेला कैदी अचानक गायब होतो. या घटनेमुळे संपूर्ण व्यवस्थेत खळबळ उडते. त्यानंतर सुरू होते एक सखोल चौकशी, ज्यातून अनेक गुपितं हळूहळू समोर येतात. कथा प्रत्येक टप्प्यावर नवीन रहस्य उलगडत जाते आणि प्रेक्षकांची उत्सुकता शेवटपर्यंत टिकवून ठेवते.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.