AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरण : जयदीप आपटेच्या अटकेनंतर आता वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले “त्याने स्वत:….”

जयदीप आपटे हा तोंडावर रुमाल बांधून अंधाराचा फायदा घेत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी कल्याणच्या घरी आला होता. त्याचवेळी घराबाहेर उभे असलेल्या बाजारपेठ पोलिसांनी जयदीपला बेड्या ठोकल्या.

शिवरायांचा पुतळा दुर्घटना प्रकरण : जयदीप आपटेच्या अटकेनंतर आता वकिलांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले त्याने स्वत:....
| Updated on: Sep 05, 2024 | 9:19 AM
Share

Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsed : छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळला. यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तर विरोधकही यावरुन आक्रमक झाले होते. या घटनेनंतर बांधकाम सल्लागार म्हणून काम करणाऱ्या चेतन पाटीलला पोलिसांनी लगेचच अटक केली होती. मात्र या दुर्घटनेतील प्रमुख आरोपी असलेला शिल्पकार जयदीप आपटे फरार झाला होता. अखेर तब्बल ११ दिवसांनी जयदीप आपटेला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. जयदीप आपटे हा अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर जयदीप आपटे हा फरार झाला होता. यानंतर काल त्याला कल्याण पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर आज जयदीप आपटेला मालवण न्यायालयात हजर केले जाणार आहे. पण जर मुंबईहून मालवणला येण्यास उशीर झाला, तर त्याला उद्या हजर केलं जाऊ शकतं, असं बोललं जात आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील दुसरा आरोपी चेतन पाटील याची आज पोलीस कोठडी संपणार आहे. त्यामुळे त्यालाही दुपारनंतर न्यायालयात हजर केले जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

11 दिवस फरार

शिल्पकार जयदीप आपटे हा पुतळा कोसळल्यापासून 11 दिवस फरार होता. यामुळे पोलिसांनी त्याच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती. त्यानंतर काल रात्री उशिरा कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जयदीप आपटेला बेड्या ठोकल्या आहेत. जयदीप आपटे हा तोंडावर रुमाल बांधून अंधाराचा फायदा घेत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी कल्याणच्या घरी आला होता. त्याचवेळी घराबाहेर उभे असलेल्या बाजारपेठ पोलिसांनी जयदीपला बेड्या ठोकल्या. रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान पोलिसांनी जयदीप आपटेला अटक केली.

वकिलांची प्रतिक्रिया काय?

तर दुसरीकडे याप्रकरणी वकिल गणेश सोवनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप आपटेबद्दल येत असलेल्या बातम्या अत्यंत चुकीच्या आणि खोट्या आहेत. त्याने स्वत:हून पोलिसांशी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणात गलिच्छ राजकारण केलं जात आहे. जयदीप आपटे हा आंतरराष्ट्रीय शिल्पकार आहे. तो खूप चांगले शिल्प काढतो. त्याच्या हातात कला आहे, असेही गणेश सोवनी यांनी म्हटले. मात्र आत्मसमर्पण करण्यासाठी जयदीप आपटेला न्यायालय किंवा पोलीस ठाणे मिळाले नाही का? तो तोंडाला रुमाल बांधून घरच्यांना भेटण्यासाठी आला, याला आत्मसमर्पण म्हणणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

शिल्पकार जयदीप आपटेच्या अटकेनंतर त्याच्या घराजवळ पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. रात्री बाराच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात त्याला सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना करण्यात आले. जयदीप आपटे याच्या विरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस जारी केली होती. आपटे पुतळा कोसळल्यापासून फरार होता. अखेर त्याला शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी जयदीपला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. जयदीप सापडल्यामुळे आता या प्रकरणात अनेक प्रश्नांची उत्तरे उलगडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फुटांचा भव्य पुतळा राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले होते. 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. मात्र काल (26 ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा कोसळला. अवघ्या 8 महिने 22 दिवसांत शिवरायांचा हा पुतळा कोसळल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजीची वातावरण आहे.

Follow Us
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
Dry Drought | दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी तातडीने बोलवली विभागप्रमुखांची बैठक; नेमकं काय घडलं?
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
मेट्रो कधी सुरू होणार? हिंजवडीच्या IT कर्मचाऱ्यांचा संताप, म्हणाले...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला...
दुष्काळग्रस्त शेतकरी मदतीवरून रोहित पवार आक्रमक; सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक