AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्तीसगडमधून बेपत्ता, नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह

छत्तीसगडच्या कोषागार विभागात सहसंचालकपदी कार्यरत असलेले राजेश श्रीवास्तव 1 मार्चपासून बेपत्ता होते. (Chhattisgarh Rajesh Srivastav found dead in Nagpur)

छत्तीसगडमधून बेपत्ता, नागपूरमधील लॉजवर अधिकाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह
कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक राजेश श्रीवास्तव
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Mar 04, 2021 | 8:41 AM
Share

नागपूर : छत्तीसगडमधील बेपत्ता अधिकाऱ्याचा मृतदेह नागपूरमधील लॉजवर संशयास्पद अवस्थेत आढळला. कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह सीताबर्डी भागातील लॉजमध्ये संशयास्पद अवस्थेत आढळला. श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात झाला, याचा शोध पोलीस घेत आहेत. (Chhattisgarh Treasury Rajesh Srivastav found dead in Nagpur Lodge)

आत्महत्येचा प्राथमिक अंदाज

छत्तीसगडच्या कोषागार विभागात सहसंचालकपदी कार्यरत असलेले राजेश श्रीवास्तव 1 मार्चपासून बेपत्ता होते. नागपूरमधील लॉजवर राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर रायपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. राजेश श्रीवास्तव यांनी आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

आठ महिन्यांपासून वेतन थकित

राजेश श्रीवास्तव यांचा मृतदेह आढळल्यामुळे छत्तीसगढमध्ये खळबळ उडाली आहे. श्रीवास्तव एक मार्चपासून मंत्रालयातून बेपत्ता झाले होते. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. गेल्या आठ महिन्यांपासून वेतन थकित असल्यामुळे राजेश श्रीवास्तव व्यथित असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

एक मार्चपासून संपर्क नाही

राजेश श्रीवास्तव यांच्याशी 1 मार्चपासून संपर्क होऊ शकत नव्हता. नागूपरमधील सीताबर्डी भागातील लॉजमध्ये 104 क्रमांकाच्या खोलीत ते राहत होते. त्यांनी बराच वेळ दरवाजा न उघडल्यामुळे लॉजमधील कर्मचाऱ्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी ते बेडवर मृतावस्थेत आढळले. लॉज मालकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

गळ्यात सोन्याची चेन, खिशात तीन हजार

ओळख पटवण्यासाठी त्यांचा मोबाईल आणि लॉजमधील नोंदीचा पोलिसांनी आधार घेतला. श्रीवास्तव यांच्या गळ्यात सोन्याची चेन, घड्याळ, मोबाईल आणि तीन हजार रुपये आढळले. रायपूरहून नागपूरला मार्केटिंगच्या कामासाठी आल्याची नोंद त्यांनी लॉजच्या रजिस्टरमध्ये केली आहे. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला. (Chhattisgarh Treasury Rajesh Srivastav found dead in Nagpur Lodge)

प्रतिनियुक्तीला हायकोर्टात आव्हान

राजेश श्रीवास्तव दीर्घ काळ विलासपूरमध्ये सहसंचालकपदी कार्यरत होते. 2019 मध्ये त्यांना अटल बिहारी वाजपेयी विद्यापीठ बिलासपूर येथे प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचा आदेश देण्यात आला. श्रीवास्तव यांनी या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. प्रतिनियुक्तीवर पाठवण्यापूर्वी आपली संमती घेतली नसल्याचं त्यांनी याचिकेत सांगितलं होतं. हायकोर्टाने त्यावर स्थगिती दिली. जून 2020 मध्ये विभागाने श्रीवास्तव यांची निधी, लेखा आणि निवृत्तीवेतन संचालनालयात बदली केली.

संबंधित बातम्या :

गोकुळ शुगरचे अध्यक्ष भगवान शिंदे यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला

(Chhattisgarh Treasury Rajesh Srivastav found dead in Nagpur Lodge)

Follow Us
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार? पुण्यातील गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?.
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ......
NEET परीक्षेबाबत मोठा निर्णय! परीक्षेसाठी 15 मिनिटे अतिरिक्त वेळ.......
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील
भारतात पेट्रोल-डिझेल दरात विक्रमी वाढ, मुंबई, पुणे, नागपूर, अमरावीतील.
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल....
देशवासियांना सकाळ सकाळीच महागाईचा धक्का; नवी दिल्लीत पेट्रोल-डिझेल.....
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं
खरात आधीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये... रुपाली चाकणकरांनी स्वतःच सांगितलं.
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा....
पुणे हादरलं! हॉस्पिटल उडवण्याचा कट; बाथरूममध्ये टाईम बॉम्ब ठेवणारा.....