AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस दिल्ली दाैऱ्यावर, घडामोडींना मोठा वेग, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातच..

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दाैऱ्यावर आहेत. यादरम्यान मोठ्या घडामोडींना वेग आलाय. देवेंद्र फडणवीस दिल्ली येथील एका कार्यक्रमात सहभागी होतील. फडणवीसांच्या या दाैऱ्याकडे राज्याच्या नजरा आहेत.

देवेंद्र फडणवीस दिल्ली दाैऱ्यावर, घडामोडींना मोठा वेग, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारातच..
Devendra Fadnavis Delhi Visi
| Updated on: Jul 07, 2026 | 9:35 AM
Share

राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या तब्बल 6 खासदारांनी मोठी बंडखोरी केली. त्यानंतर एका आमदाराची थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाली. शिवसेना ठाकरे गटात मोठी बंडखोरी होत आहे. यासोबतच अजूनही काही आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी याच पार्श्वभूमीवर आज मंगळवारी रात्री 7 वाजता राज्यातील सर्व आमदारांची बैठकी बोलवली आहे. सचिन आहिर यांच्या बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला. ऑपरेशन टायगर सुरू आहे. शिवसेनेचे काही आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात. यासोबतच दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. ज्यात राज्यातील अनेक नेत्यांना थेट संधी मिळणार असून केंद्रात मंत्रिपद मिळवण्याची संधी आहे.

शिवसेना ठाकरे गटातून बंडखोरी करून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेल्या 6 खासदारांपैकी दोघांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे स्पष्ट आहे. यासोबतच खासदार श्रीकांत शिंदे यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीच थेट एकनाथ शिंदे हे दिल्ली दाैऱ्यावर होते. आता मोठी माहिती पुढे येत आहे.

याच सर्व पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्ली दाैऱ्यावर जाणार आहेत. आज देवेंद्र फडणवीस दिल्ली दाैऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमात ते सहभागी होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या या दिल्ली दाैऱ्याला महत्वप्राप्त झाले. सातत्याने उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगितले जात आहे की, दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांचे पंख कट करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पावर दिली जात आहे.

यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देखील दिले. मागील काही दिवसांपासून एका मागून एक मोठे धक्के एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांना देत आहेत. मोठी बंडखोरी त्यांच्या पक्षात झाली. 6 खासदारांच्या मतदार संघात सभा घेऊन उद्धव ठाकरे मुंबईत पोहोचल्यानंतर थेट सचिन आहिर यांना विधान परिषदेचे उपसभापतीपद एकनाथ शिंदे यांनी देऊन थेट धक्का दिला.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे