AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कुणावर डोळा? विरोधकांच्या कोणत्या आरोपावर पलटवार? पाहा

मुंबई काय देशाच्या बाहेर आहे का म्हणत ? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीसह ठाकरे यांना स्पष्टच सुनावलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं कुणावर डोळा? विरोधकांच्या कोणत्या आरोपावर पलटवार? पाहा
Image Credit source: Google
| Updated on: Feb 13, 2023 | 12:58 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राचा महासंकल्प ( Maharashtra Mahasankalp ) टीव्ही 9 मराठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांनी महाराष्ट्राचा महासंकल्प सादर केला आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची पुढील काळातील वाटचाल कशी असणार हे सांगत असतांना त्यांनी महाविकास आघाडी ( Mahavikas aghadi )  सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला केंद्र सरकार मदत करत नव्हते यांसह मुंबई महानगर पालिकेच्या एफडीवर डोळा असल्याच्या आरोपावर भाष्य केलं आहे. थेट आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता पलटवार केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्र सरकारकडे सहकार्य मागितले पाहिजे तरच कुणीही सहकार्य देतं. कडकसिंग बनवून चालत नाही, थोडं लोकांसाठी मागितले पाहिजे ना म्हणत म्हणत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

तर यामध्ये अमित शाह यांच्याकडून सहकार विभागाला दहा हजार कोटी रुपयांची मदत झाल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे. साखर उद्योग त्यामुळे अडचणीतून बाहेर येईल असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे.

आम्ही विनंती केली त्यामुळे हे सर्व झाले आहे. मुंबई काय देशाच्या बाहेर आहे का ? पंतप्रधान येतात म्हणून काय झाले. कार्यक्रमाला आणि उद्घाटनाला आले तर कुणाला अॅसिडिटी होण्याचे कारण काय म्हणत थेट ठाकरे कुटुंबावरच निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपवर ठाकरे गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यावरून हल्लाबोल केला जात होता. यामध्ये ठाकरे गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बीएमसीच्या एफडीवर डोळा असल्याचा आरोप केला होता.

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्या या आरोपावर भाष्य केलं आहे. ठाकरे यांनी मुंबईकरांना विकासापासून दूर ठेवलं आहे. मुंबईकरांचा पैसा अडकून मुंबई खड्ड्यात घातली असेही एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

निवडणुका डोळ्यासमोर राहू आम्ही काहीही करत नाही. शेवटी निवडणुका येतात आणि जातात. त्यामुळे सत्ता काही कुणाच्या नावावर कायमस्वरूपी नसते. त्यामुळे असे काहीही आम्ही डोळ्यासमोर ठेवून करत नाही.

आम्ही काही मुंबईकरांना विकासापासून वंचित ठेवले नाही. आमचा डोळा आहे जनतेच्या हितावर आणि विकासावर आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे. याशिवाय एफडीचे पैसे जनतेच्या करातून आलेले पैसे तुम्ही ठेवून काय करतात.

जनतेचे पैसे घेऊन त्यांना सुविधा दिल्या नाही, मुंबईत खड्डे पडले आहे, समुद्राचे पाणी दूषित केले आहे. त्यामुळे आम्ही एफडीवर नाही जनतेच्या विकासावर डोळा ठेवत असल्याचा पलटवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.