AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

” मुख्यमंत्री हा शेतकऱ्याचा मुलगा”; शेताच्या बांधावरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं

सध्या त्यांच्याबरोबर कोणी फोटो काढायलाही तयार नाही. आपल्या सोबत फोटो काढायलादेखील लोकांना आवडायला लागते. त्यामुळे फोटो कोणाबरोबर काढायचे हे लोक ठरवतात असा घणाघातही त्यांनी ठाकरे गटावर केला आहे.

 मुख्यमंत्री हा शेतकऱ्याचा मुलगा; शेताच्या बांधावरून एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावलं
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Apr 11, 2023 | 8:24 PM
Share

धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यांमधून जोरदार अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून नाशिक, अहमदनगर, जळगाव, धाराशिव भागातही शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने आज तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिवमधील शेतकऱ्यांची जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अवकाळी पावसात नुकसान झालं तरी सरकारकडून त्यांना तात्काळ मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मदत देणार असल्याचे सांगत त्यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटावर निशाणा साधताना म्हणाले की, घरात बसून लोकांचे प्रश्न सुटत नाहीत. त्यासाठी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरावं लागते.

शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले झाल्यामुळे मी शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचे नुकसान पाहायला आलो असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच यावेळी त्यांनी सांगितले की, शेतकरी हा प्रचंड उद्ध्वस्त झाला आहे. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही असंही त्यांनी यावेळी अश्वासन दिले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. तसेच या आमच्या सरकारने जे निर्णय घेतले आहेत ते शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचेही त्यांनी बोलून दाखवले.

आमच्या सरकारने एनडीआरएफचे नियम बदलून डबल मदत केली असून नुकसान भरपाईचे क्षेत्रही वाढवले असल्याचे त्यांनी यावेली सांगितले. त्याचबरोबर सततच्या अवकाळी पावसामुळे होणारे नुकसानही आम्ही नैसर्गिक आपत्तीमध्ये ग्राह्य धरले आहे असं जाहीर अश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अयोध्या दौऱ्यावरून विरोधकांनी टीका केली होती. आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर अयोध्या आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीवरून टीका करण्यात आली होती.

त्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, मला शेतकऱ्यांबद्दल आस्था आहे म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर नव्हे तर शेतात आलो आहे असा टोलाही त्यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला आहे. मंत्रालयात किंवा घरात बसून आदेश देणारा हा मुख्यमंत्री नाही या शब्दात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे.

विरोधक जे आज बोलत आहेत त्यांनी एवढे तरी करून दाखवावे.मात्र सध्या त्यांच्याबरोबर कोणी फोटो काढायलाही तयार नाही. आपल्या सोबत फोटो काढायलादेखील लोकांना आवडायला लागते. त्यामुळे फोटो कोणाबरोबर काढायचे हे लोक ठरवतात असा घणाघातही त्यांनी ठाकरे गटावर केला आहे.

तसेच मुख्यमंत्री हा शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात जे काही संकट येत आहेत त्यामागे सरकार पाठीशी उभा राहील अशा शब्दात घणाघात केला आहे.

तसेच एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, काल आयोध्येत रामाकडे मी हेच मागितलं की बळीराजाचं संकट दूर होऊ दे मात्र आम्ही आमच्यासाठी काही मागितलं नाही अशी भावनाही त्यांनी यावेळी शेतकऱ्यांसमोर व्यक्त केली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच