AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप आमदाराच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद मिळाल्याचा दावा

ख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्याबद्दल पॉझिटिव्ह निर्णय घेतील. मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली आणि त्यांच्या आशीर्वादाने मी हे काम करत आहे. यामुळे जो व्यक्ती निवडून येईल त्यालाच महायुती उमेदवार देईल, अशी आपणास खात्री आहे, असे त्यांनी म्हटले.

भाजप आमदाराच्या विरोधात मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद मिळाल्याचा दावा
बालाजी पाटील, एकनाथ शिंदे
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 21, 2024 | 12:10 PM
Share

प्रशासकीय सेवेत असणारे आणखी एक अधिकारी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरत आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे आशीर्वाद मिळाल्याचा दावा केला आहे. गेली 37 वर्षे प्रशासकीय सेवेत काम करणारे अधिकारी बालाजी पाटील खतगावकर थेट भाजप आमदाराविरोधात निवडणूक मैदानात उतरले आहे. यामुळे आता महायुतीकडून कोणाला तिकीट मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच खतगावकर यांनी आपल्या खासगी सचिव पदाचा राजीनामा दिला होता.

भाजप आमदाराचे तिकीट कापणार?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी काम केले आहे. मुख्यमंत्र्याचे विश्वासू अधिकारी म्हणून खतगावकर यांची ओळख होती. शासकीय सेवेतील निवृत्तीनंतर खतगावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी नांदेडच्या मुखेड – कंधारमधून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. मात्र या ठिकाणी आता भाजपाचे विद्यमान आमदार तुषार राठोड प्रतिनिधी करत आहेत. त्यामुळे मुखेड – कंधार मतदारसंघात भाजप व शिंदे गटात उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे.

सर्व पक्षीय नेत्यांची मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आपण राजकीय निर्णय घेतला आहे, असे बलाजी पाटील खतगावकर यांनी म्हटले आहे. महायुतीत निवडून येणे महत्त्वाचे आहे. मी विधानसभा निवडणूक लढवली पाहिजे, असा आग्रह सर्व पक्षीय नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केला आहे. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मुखेडमधून मी उमेदवार करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही सनदी अधिकारी असलो तरी लोकप्रतिनिधीच खऱ्या अर्थाने राज्यकर्ते असतात, असे खतगावकर यांनी म्हटले.

निवडून येणाऱ्यांना उमेदवारी

भाजप आमदार तुषार राठोड विद्यामान आमदार आहेत, हे मला माहीत आहे. मात्र निवडून येणे हा महत्त्वाचा घटक आहे, असे बालाजी पाटील खतगावकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री माझ्याबद्दल पॉझिटिव्ह निर्णय घेतील. मुख्यमंत्री व दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत माझी चर्चा झाली आणि त्यांच्या आशीर्वादाने मी हे काम करत आहे. यामुळे जो व्यक्ती निवडून येईल त्यालाच महायुती उमेदवार देईल, अशी आपणास खात्री आहे, असे त्यांनी म्हटले.

प्रचाराची जोरदार तयारी, दोन राउंड पूर्ण

खाजगी सचिव म्हणून मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. गेल्या पंचवीस वर्षांपासून मी त्यांच्यासोबत काम करत आहे. मुखेड – कंधार विधानसभामध्ये माझे दोन राउंड पूर्ण झाले आहेत, भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस व आरपीआयचे सर्व नेते मला पाठिंबा देत आहेत. माझ्या कामाची पद्धत सर्व नेत्यांनी फार जवळून पाहील आहे, असे बालाजी पाटील यांनी म्हटले.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!