AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलीय, आता बदनामी थांबवा; संजय राठोडांनी हात जोडले

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी लावली आहे. (Chief Minister has ordered an inquiry of pooja chavan suicide case, wait till case report says sanjay rathod)

VIDEO: मुख्यमंत्र्यांनी चौकशी लावलीय, आता बदनामी थांबवा; संजय राठोडांनी हात जोडले
| Updated on: Feb 23, 2021 | 2:32 PM
Share

वाशिम: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी लावली आहे. पोलीस तपास करत आहेत. तपासात सर्व सत्य बाहेर येईल. आता तरी बदनामी थांबवा, अशी हातजोडून विनंतीच वनमंत्री संजय राठोड यांनी केली. राठोड यांनी अवघ्या दहा मिनिटात त्यांची बाजू मांडली. मात्र मीडियाने विचारलेल्या प्रश्नाला बगल दिली. (Chief Minister has ordered an inquiry of pooja chavan suicide case, wait till case report says sanjay rathod)

पूजा चव्हाण प्रकरणात आरोप झाल्यानंतर संजय राठोड यांनी पहिल्यांदाच मौन सोडलं. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणात आपला हात नसल्याचा अप्रत्यक्ष दावाच केला. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी लावली आहे. पोलीसही तपास करत आहेत. तपासात सर्व गोष्टी स्पष्ट होतील. चौकशीतून सत्य बाहेर येईल. पण समाजाची आणि माझी वैयक्तित बदनामी करू नका, असं ते म्हणाले. पत्रकार परिषदेत राठोड बराच वेळ हात जोडून बोलत होते. त्यांना तोंडाला मास्क लावले होते. पण तरीही त्यांच्यावरील तणाव स्पष्टपणे जाणवत होता.

व्हायरल गोष्टीत तथ्य नाही

मी मागासवर्गीय समाजातून आलो आहे. भटक्या विमुक्तांसाठी काम करत आहे. मी ओबीसींचा नेता आहे. पण गेल्या काही दिवसांपासून घाणेरडं राजकारण करून माझ्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचं काम सुरू आहे. विविध माध्यमांवर माझ्या बाबतीत जे काही दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. जे काही व्हायरल होत आहे. त्यात काही तथ्य नाही, असा दावाही त्यांनी केला.

कामकाज सुरू होतं

यावेळी त्यांनी आपण दहा दिवस गायब झालो नसल्याचाही दावा केला. मी दहा दिवस कुठेही गेलो नव्हते. जे काही सुरू होतं. त्यामुळे मी माझ्या कुटुंबाला सावरत होतो. माझ्या पत्नीला ब्लड प्रेशरचा त्रास आहे. माझी वृद्ध आई आहे. या सर्वांना मी सावरत होतो. मुंबईच्या माझ्या कार्यालयातून माझं काम सुरू होतं. मी आज काही बोलणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

विश्वास ठेवा चौकशीतून सत्य बाहेर येईल

अरुण राठोडसोबत काढण्यात आलेल्या फोटोवरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी चार वेळा निवडून आलो आहे. गेल्या 30 वर्षांपासून सामाजिक कार्यात आहे. माझ्यावर समाजाचे प्रेम आहे. त्यामुळे अनेक लोक येतात आणि माझ्यासोबत फोटो काढतात. असं सांगत विश्वास ठेवा चौकशीतून सर्व काही बाहेर येईल, असंही त्यांनी सांगितलं. (Chief Minister has ordered an inquiry of pooja chavan suicide case, wait till case report says sanjay rathod)

संबंधित बातम्या:

एका घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभं करू नका; संजय राठोड यांची हात जोडून विनंती

प्रवास, गर्दी ते तोंडाला मास्क, पोहरादेवी गडावर संजय राठोडांच्या पत्नीला भोवळ!

संजय राठोड दोन तासात पोहरादेवीत; वाचा, सकाळपासून नेमकं काय काय घडलं!

Sanjay Rathod Pohradevi visit LIVE | पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन घाणेरडं राजकारण, संजय राठोडांची पहिली प्रतिक्रिया

(Chief Minister has ordered an inquiry of pooja chavan suicide case, wait till case report says sanjay rathod)

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.