AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सव काळात डीजे बंदीचे संकेत, पुण्यातून मोठं आवाहन

सांस्कृती कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या वापरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेकांकडून डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे.

मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सव काळात डीजे बंदीचे संकेत, पुण्यातून मोठं आवाहन
devdra fadnvisImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 31, 2026 | 5:09 PM
Share

सांस्कृतीक कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या वापरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेकांकडून डीजेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. पुण्यामध्ये भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, या बैठकीमध्ये ते बोलत होते. डीजेच्या वादात न पडता, सांस्कृतीक पद्धतीने गणेश्वोत्सव साजरा करा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणेकर गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीने साजरा करू शकतात, असंही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

सांस्कृतीक कार्यक्रमात होणाऱ्या डीजेच्या वापरावरून सध्या वातावरण चांगलंच तापलं आहे. डीजेमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी डीजेवर बंदी घातली जावी अशी मागणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात भाजपच्या कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं आवहान केलं आहे. मी जेव्हा या कार्यक्रमातून बाहेर पडेल तेव्हा मीडिया मला पुण्यासंदर्भात एकच प्रश्न विचारणार आहे. तुम्ही गणेशोत्सवाचं बोललात मग गणेशोत्सवात डीजे वाजला पाहिजे की नाही? हा प्रश्न मला नक्की विचारला जाणार आहे. पण मी पुणेकरांना सांगू इच्छितो. पुण्यामध्येच ही क्षमता आहे. की संपूर्ण सांस्कृतिक पद्धतीने उत्सव साजरा केला पाहिजे. हे फक्त पुणेकरच करू शकतात. माझं पुणेकरांना आवाहन आहे, डीजेच्या वादात न पडता, पुणेकरांनी संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की संपूर्ण सास्कृतीक पद्धतीने गणेशोत्सव कसा साजरा होतो? असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

विरोधकांवर हल्लाबोल 

दरम्यान भाजपच्या कार्यकारीणीच्या बैठकीत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विरोधकांवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच पेट्रोल, डिझेल संदर्भात देखील त्यांनी मोठं विधान केलं. आज आपण संपूर्णपणे पेट्रोल, डिझेलसाठी इतर देशांवर अवलंबून आहोत. परंतु मला विश्वास आहे, की येत्या 2030 पर्यंत देशाच्या इंधनाची 50 टक्के गरज हे शेतकरी भागवतील तर 50 टक्के गरज ही ईव्हीच्या माध्यमातून भागवली जाईल, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप