CJP protest : दिल्ली पोलिसांना मोठा झटका, अडचणी वाढल्या, आता थेट सुप्रीम कोर्टात…
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे. शनिवारपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीमध्ये कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. शनिवारी या आंदोलनाला दिल्लीमध्ये सुरुवात झाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी पोलिसांनी आंदोलकांची धडपकड केली. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना तर विमानातूनच ताब्यात घेण्यात आलं होतं. सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. आज या सर्वांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान त्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मोठी बातमी समोर आली आहे.
‘सुप्रीम कोर्ट ॲडव्होकेट्स-ऑन-रेकॉर्ड असोसिएशन’ने (SCAORA) देखील एक याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयात कलम ३२ अन्वये ही याचिका दाखल करण्यात आली आहे. १० ऑक्टोबर रोजी आंदोलन करणाऱ्या वकिलांविरुद्ध पोलिसांनी केलेल्या कारवाईला या याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. यात बेकायदेशीरपणे ताब्यात घेणे, महिला वकिलांसह इतर वकिलांशी गैरवर्तन करणे आणि एका वकिलाला दुखापत करणे, असे आरोप या याचिकेमध्ये करण्यात आले आहेत.
तसेच, मोबाईल इंटरनेट सेवा बंद करणे आणि बॉडी कॅमेरे व ड्रोनद्वारे पाळत ठेवणे या गोष्टींनाही या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे. SCAORA ने स्वतंत्र आणि कालमर्यादित चौकशी, सीसीटीव्ही व इतर फुटेज जतन करणे, पोलीस कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि शांततापूर्ण निदर्शने व व्यावसायिक कामकाज करण्याच्या वकिलांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान दुसरीकडे आज कॉकरोच जनता पार्टीच्या वतीने एक महत्त्वाची पत्रकार परिषद देखील पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी सरकारवर जोदार हल्लाबोल केला आहे. मुंबईमध्ये देखील आंदोलन चांगलंच पेटलं असून, शिवाजी पार्क परिसरात पोलिसांकडून आंदोलकांची धडपकड सुरू आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.
