Devendra Fadnavis : ठाकरे गटासह मविआने निवडणूक सीरिअसली का लढवली नाही? मुख्यमंत्र्यांचं विचार करायला भाग पाडणारं उत्तर

Devendra Fadnavis : आज महाराष्ट्रातील नगर परिषदा आणि नगर पंचायतींचे निकाल जाहीर झाले. भाजप या निवडणुकीत मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीने घवघवीत यश संपादन केलं. या निकालांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत.

Devendra Fadnavis : ठाकरे गटासह मविआने निवडणूक सीरिअसली का लढवली नाही? मुख्यमंत्र्यांचं विचार करायला भाग पाडणारं उत्तर
Devendra Fadnavis
| Updated on: Dec 21, 2025 | 5:29 PM

“2014 नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत शहर आणि गावात भाजप विजयी झाला आहे. आमचा परफॉर्मन्स 2024 च्या लोकसभेत खाली गेला. तेव्हा मते कमी झाली नाही. त्यावेळी ग्रामीण भागात आम्हाला चांगली मते मिळाली. भाजप सर्व जाती आणि सर्व समाजाचा पक्ष आहे. महाराष्ट्राचा नंबर वन पक्ष भाजपच आहे” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते महाराष्ट्र नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या निकालावर बोलत होते. “आम्ही रत्नागिरीत महायुती म्हणून लढलो. यश मिळालं. सिंधुदुर्गात युती नव्हती. तिथे काही जागा जिंकलो, काही जागा हरलो. बाकी ठिकाणी आम्ही जिंकलो. आम्ही जिथे जिथे लढलो तिथे आमचा विजयच झाला आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“विरोधी पक्षाच्या नेत्यांना हे लक्षात आलं होतं की या निवडणुकीत महायुतीचाच विजय होणार आहे. त्यामुळे ते बाहेरच पडले नाही किंवा कमी पडले. आता हरल्याचं लोकांना कळलं तर महापालिका आणि जिल्हा परिषदेत कार्यकर्त्याचं मोरल डाऊन होईल. आता ते सांगू शकतात की आम्ही निवडणुकीत उतरलो नाही. आम्ही सीरिअसली घेतलं नाही” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निवडणुकीत काम न करणं हा करंटेपणा

“पण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आम्ही ताकदीने उतरलो. 10 हजार लोकसंख्येच्या गावात आम्ही गेलो. जे कार्यकर्ते लोकसभा आणि विधानसभेला निवडून आणतात. पण त्यांच्या निवडणुकीत काम न करणं हा करंटेपणा आहे. त्यांना वाऱ्यावर सोडता येणार नाही. तिथे आपली प्रतिष्ठापणाला न लावणं योग्य नाही. भाजप असं करत नाही. जिंकलो आणि हरलो तरी आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठी असतो” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.