AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीवरुन राजकारण तापलं, अखेर मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका जाहीर, VIDEO

Devendra Fadnavis : महाराष्ट्रात विशेषकरुन मुंबईत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयावरुन राजकारण तापत चाललं आहे. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर सरकारची भूमिका जाहीर केली आहे.

Devendra Fadnavis : रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीवरुन राजकारण तापलं, अखेर मुख्यमंत्री फडणवीसांकडून भूमिका जाहीर, VIDEO
Devendra Fadnavis
| Updated on: Apr 25, 2026 | 9:47 AM
Share

मुंबई, महाराष्ट्रात रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय राजकीय मुद्दा बनला आहे. यावरुन राजकीय वादविवाद सुरु झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या विषयात आक्रमक भूमिका घेत इशारा दिला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतला. येत्या 1 मे पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना ग्राहकांना मराठी भाषेत बोलावं लागेल. मराठी लिहिता, वाचता न येणाऱ्या रिक्षा, टॅक्सी चालकांचे परवाने येत्या 1 मे पासून रद्द करण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे. मराठी भाषा सक्तीची करण्याच्या या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात 4 मे पासून 15 लाख रिक्षाचालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

त्यावर मनसे नेत संदीप देशपांडे यांनी “तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा. या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे” असं म्हटलं आहे. आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्यावर सरकारची भूमिका मांडली आहे. मुंबई, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह चुकीचा नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. “पहिली गोष्ट म्हणजे मुंबई, महाराष्ट्रात मराठीचा आग्रह होणं, मराठीला प्राथमिकता द्या सांगणं चुकीचं नाही. सरकारची भूमिका काय असेल, तर वाद होऊ नये ही आमची भूमिका आहे. ज्यांना टॅक्सी, रिक्षा चालकांना मराठी येत नाही, त्यांना मराठी शिकवू” असं फडणवीस म्हणाले.

ते जास्त शिकलेले लोक नाहीत

“रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून मराठी बोलण्याची अपेक्षा केली पाहिजे. त्यांनी मराठीतून संवाद साधला पाहिजे. पण त्यांची चाचणी घेऊ नका, कारण ते जास्त शिकलेले लोक नाहीत. जास्त शिकलेले लोक रिक्षा, टॅक्सी चालवणार का?” असा सवाल संजय निरुपम यांनी विचारला. कॉर्पोरेटमध्ये काम करणारे रिलायन्स, बिर्ला यांच्या कंपन्यांमध्ये काम करणारे सगळे लोक मराठीत बोलतात का?. झोमॅटो, स्विगीवरुन पार्सल घेऊन येणारे मराठीत बोलतात का?” असे प्रश्न संजय निरुपम यांनी विचारले आहेत.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच