AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MNS : ‘तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा, या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून..’ मनसेचं ओपन चॅलेंज

MNS : रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीची करण्यात आली आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यावरुन वादविवाद सुरु आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निर्णयाचं समर्थन केलं आहे.

MNS : 'तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा, या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून..' मनसेचं ओपन चॅलेंज
Sandeep Deshpande-Sanjay Nirupam
| Updated on: Apr 24, 2026 | 10:22 AM
Share

महाराष्ट्रातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा बंधनकारक करण्यात आली आहे. त्यांना ग्राहकांशी मराठीत बोलावं लागेल. येत्या 1 मे पासून या आदेशाची अंमलबजावणी सुरु होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या निर्णयावर मोठा वादही सुरु झाला आहे. शिवसेनेतूनच संजय निरुपम या सक्तीच्या विरोधात आहेत. मराठी लिहिता आणि वाचता न येणाऱ्या रिक्षा किंवा टॅक्सी चालकांचे परवाने येत्या 1 मे पासून रद्द करण्याचा इशारा सरनाईक यांनी दिला आहे. या मराठी सक्तीच्या विरोधात येत्या 4 मे पासून 15 लाख रिक्षाचालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा रिक्षा, टॅक्सी चालकांवर मराठी सक्तीच्या बाजूने मैदानात उतरली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी इशारा दिला आहे.

“ज्या पद्धतीने मुंबईला बंद पाडण्याची धमकी देत देत आहेत, धमकी देणाऱ्या भैय्याला धडा शिकवण्याची हीच ती योग्य वेळ आहे. मुंबई आमच्याशिवाय चालूच शकत नाही अशांना धडा शिकवा. स्थानिक भाषा येत नसताना देखील यांना लायसन्स दिली कोणी? अशा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे” अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे. “10-12 शब्द कशाला, पूर्ण मराठी भाषा येणं गरजेचं आहे. राज्यात काम करताना पैसे कमावता, इकडे पोट भरता, मग भाषा का नाही येत?” असं संदीप देशपांडे यांनी विचारलं आहे.

एवढ करून देखील भैय्या लोक त्याला मतदान करत नाहीत

“आमच्या राज्यात यायला भाषेची गरज आहे. यूपीमध्ये मराठी भाषा शिकवली पाहिजे. भविष्यात आपल्या राज्यावर संकट येऊ शकतं. संजय निरुपम हा अतिशय टुकार माणूस आहे. एवढ करून देखील भैय्या लोक त्याला मतदान करत नाहीत. तुमची ताकद आम्हाला 4 तारखेला दाखवा. या भैय्या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून बाहेर पाठवण्याची वेळ आली आहे” असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिली.

लोढा कट्टर मराठी विरोधी

“भाजपचा रडीचा डाव आहे, महिला बिल आणताय ना? मग महिलेचा संताप सहन करायला शिका” अशी टीका भाजपच्या जनआक्रोश मोर्चावर त्यांनी केली. ” लोढा कट्टर मराठी विरोधी आहे. मुंबईने मंगल प्रभात लोढाला एवढ मोठं केलं, तोच कट्टर मराठी द्वेषी आहे. मागेच म्हटलं होतं, मुंबई महापालिका भूखंडाचे श्रीखंड करत आहे. KEM आणि एकलव्यचा काय संबंध? आमच्या मनोज चव्हाण यांनी पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच नाव द्यावं अशी मागणी केली आहे ती योग्य आहे” असं संदीप देशपांडे म्हणाले.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच