
“हिंदी सक्ती हवीच कशाला या लेखांचा संग्रह उद्धवजींनी दिल्यामुळे मी अतिशय नीट वाचला. माझी एवढीच मागणी आहे की, जेव्हा हा अहवाल आपल्याला सुपूर्द केला ती पण बातमी लावावी. तो अहवाल स्वीकारल्याच्या बातम्या पेपरला आलेल्या ती पण बातमी त्यात लावावी. मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर त्या संदर्भात अधिकृत पोस्ट आपण केली. त्याची कात्रण आपण लावावी. एवढीच माझी माफक मागणी आहे. त्यापेक्षा जास्त माझी मागणी नाही” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले.
“आपल्याला पुढची भेट घ्यावी लागेलच. नाहीतर यांना खाद्य कसं मिळेल? हे कठीणच झालं जयंतराव, तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार. हे आमच्याकडे येऊन गेले की हे भाजपसोबत येणार. आपण संवादाच्या गोष्टी करतो, मी माध्यमांना दोष देत नाही. पण माझी विनंती आहे की, कोणी कोणाला भेटले म्हणजे तो त्यांच्या पक्षात चालला आहे, युतीच होतेय असं नसतं” असं देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.
नागपूरमधील गुन्हेगारी किती कमी झाली ?
“अनेक आमच्या सदस्यांनी या ठिकाणी गुन्हेगारी वाढली त्याची आकडेवारी सांगितली. अनेक वर्ष गृहविभागाच्या चर्चेला उत्तर देताना नेहमी हे सांगतो गुन्हेगारी संदर्भातील आकडेवारीच विश्लेषण करणं हे संवेदनशील वाटत नाही. तथापी समोरुन आकडेवारी माडंली गेली की आपल्याला आकडेवारी मांडावीच लागते. 2024 ची तुलना केली, तर गुन्हे 11656 ने कमी झाले आहेत. 6.75 टक्क्याने गुन्हे कमी झालेत. मग खून, खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे सगळे गुन्हे कमी झालेले आहेत. सायबर गुन्हे उघड होण्याच प्रमाण वाढलं आहे” अशी माहिती आकडेवारीनिशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं.