Cm Uddhav Thackeray : 8 जूनच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा? खैरे म्हणतात…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदेशीर बाबी सर्व पूर्ण करणार आहेत, आम्ही औरंगाबादला 1988 पासून संभाजी नगर म्हणतो, आम्ही म्हणतो म्हणजे नामकरण असून असे खैरे म्हणाले. खैरे यांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितल्याने 8 जुन रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद येथील सभेत नामकरणची घोषणा करणार का याची चर्चा होत आहे.

Cm Uddhav Thackeray : 8 जूनच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा?  खैरे म्हणतात...
8 जूनच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत औरंगाबाद, उस्मानाबादच्या नामांतराची घोषणा?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 6:36 PM

उस्मानाबाद : उस्मानाबादचं धाराशिव (Dharashiv) व औरंगाबादचं संभाजीनगर (Sambhajinagar) नामकरणाची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कागदपत्र व संपूर्ण फाईल तयार झाली आहे एखादा दिवशी घोषणा होईल अशी माहिती शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी उस्मानाबाद येथे दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कायदेशीर बाबी सर्व पूर्ण करणार आहेत, आम्ही औरंगाबादला 1988 पासून संभाजी नगर म्हणतो, आम्ही म्हणतो म्हणजे नामकरण असून असे खैरे म्हणाले. खैरे यांनी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितल्याने 8 जुन रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद येथील सभेत नामकरणची घोषणा करणार का याची चर्चा होत आहे. बाळासाहेब ठाकरे औरंगाबाद येथील सभेत म्हणाले होते, कशाला हवा हा औरंग्या , त्याने मंदिरे तोडली सभाजी महाराज यांना त्रास दिला मग त्याचे नाव कशाला ? तेव्हापासून आम्ही संभाजीनगर म्हणतो. असेही खैरे यावेळी म्हणाले आहेत.

मित्रपक्षांचा विरोध मावळणार?

गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेकडून ही नामांतराची मागणी उचलून धरली जात आहे. मात्र आधीच्या सरकारांनी ही सेनेची मागणी पूर्ण केली नाही. आणि यावेळी सेना सत्तेत येऊनही मित्रपक्षांच्या विरोधामुळे त्यांनी या शहरांचं नामांतर करता आले नाही. कारण गेल्या वेळीही या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी या नामांतराला थेट विरोध केला होता. तसेच शिवसेनेचे कान टोचत शिवसेनेला किमान सामन कार्यक्रमाची आठवणही करून दिली होती. त्यामुळे त्यावेळी तो प्रश्न जसाचा तसा राहिला. मात्र खैरेंच्या विधानानंतर या मुद्द्याला पुन्हा बुडबुडे आले आहेत.

राज ठाकरे यांची नामांतरावरून टीका

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची बीकेसीत सभा पार पडली, या सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले काय गरज आहे नामांतराची, मी तर सुरूवातीपासून संभाजीनगरच बोलतो, मी बोललो म्हणजे झालं ना, तर यावर बोलताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्याना जोरदार टोलेबाजी केली होती. तु बोलतो म्हणजे काय? तु काय सरदार पटेल आहेस का? तु कोण आहेस? असा थेट सवाल केला होता.

हे सुद्धा वाचा

फडणवीसांचीही यावरून सेनेवर सडकून टीका

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदा चिमटे काढले होते. मुख्यमंत्री म्हणतात मी बोलतो तर झालं ना…मग ओ खैरे व्हा आता बहिरे…असे म्हणत देवेंद्र फडणवीस शिवसेनेवर जोरदार बरसले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांच्या 8 जूनच्या सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुख्यमंत्री नामांतराची घोषणा करणार का? आणि या सभेतून विरोधकांच्या टीकेला काय उत्तर देणार? हे दोन प्रश्न सध्या राजकारणात गाजत आहेत.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.