MPSC Exam: मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय विषय कळत नाहीत, ते केवळ वेळ मारुन नेतात: चंद्रशेखर बावनकुळे

द्धव ठाकरे हे सक्षम मुख्यमंत्री असते तर त्यांनी राज्य सेवा आयोगाची पूर्व परीक्षा (MPSC Exam) 14 मार्चलाच घेतली असती | Chandrashekhar Bawankule

MPSC Exam: मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय विषय कळत नाहीत, ते केवळ वेळ मारुन नेतात: चंद्रशेखर बावनकुळे
मुख्यमंत्र्यांना बऱ्याच विषयांचा अभ्यास करावा लागतो, मग मुख्यमंत्री वेळ मागून घेतात, मग अधिकारी सांगतील त्याप्रमाणे वागतात.


नागपूर: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रशासनातील फारशा गोष्टी कळत नाहीत. त्यामुळे ते केवळ वेळ मारून नेण्याचे काम करतात, अशी टीका भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली. मुख्यमंत्र्यांना बऱ्याच विषयांचा अभ्यास करावा लागतो, मग मुख्यमंत्री वेळ मागून घेतात, मग अधिकारी सांगतील त्याप्रमाणे वागतात. उद्धव ठाकरे हे सक्षम मुख्यमंत्री असते तर त्यांनी राज्य सेवा आयोगाची पूर्व परीक्षा (MPSC Exam) 14 मार्चलाच घेतली असती, असे बावनकुळे यांनी म्हटले. (BJP leader chandrashekhar bawankule on MPSC exam)

MPSC च्या विद्यार्थ्यांचे आंदोलन चिघळण्यास सरकार जबाबदार आहे. सरकारमधील मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. अधिकाऱ्याने परीक्षा पुढे ढकलण्याचे पत्र काढले तेव्हा सरकार झोपले होते का? हा आदेश काढणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे मोघलांचं सरकार आहे. पूर्वीच्या काळी औरंगजेबाची स्वारी आली की लोकांमध्ये भीती निर्माण व्हायची. तशीच भीती आता नागरिकांमध्ये निर्माण होत असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

MPSC ची तारीख आज जाहीर होणार, आठ दिवसात परीक्षा कशी होणार? मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे राज्याचे डोळे

एमपीएससी पूर्व परीक्षा (MPSC preliminary Exam) पुढे ढकलल्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांचा उद्रेक झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज परीक्षेची तारीख जाहीर असल्याचं गुरुवारी संध्याकाळी केलेल्या संबोधनात सांगितलं. मात्र हे सांगत असताना शासकिय यंत्रणा आणि तिच्या तयारीवर उद्धव ठाकरेंनी प्रकाश टाकला. आज तारीख जाहीर होऊन येत्या आठ दिवसांत ही परीक्षा होईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यानंतर आता परीक्षेची कोणती तारीख घोषित होतीय?, याकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसह संपूर्ण राज्याचे डोळे लागलेत.

आठ दिवसात परीक्षा कशी होणार, मुख्यमंत्री काय म्हणाले?

येत्या आठ दिवसांत ही परीक्षा घेणारच, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. परंतु ही घोषणा करताना शासकीय यंत्रणा आणि तिच्या तयारीपद्दलही मुख्यमंत्री बोलले. मग ही परीक्षा होताना शासकीय यंत्रणेची परीक्षेची तयारी, सुपरव्हिजन करणारे शिक्षक, वर्गखोल्या, त्यात सुरु असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आदी विषयांवर मुख्यमंत्री बोलले.

आपल्याला कल्पना असेल या परीक्षेला संपूर्ण शासकीय यंत्रणा लागते. विद्यार्थ्यांची सोय करण्यापासून पेपर गोळा करुन गठ्ठे बांधण्यापर्यंत नियोजन करावं लागतं.त्यासाठी कर्मचाऱ्यांची तयारी करुन घ्यावी लागणार आहे. कोरोनाचा राक्षस पुन्हा डोकं वर काढतोय. त्यामुळे जे कर्मचारी परीक्षेसाठी काम करणार आहेत त्यांची टेस्ट केली जाणं महत्त्वाचं आहे. ज्यांना लस दिली गेली तेच कर्मचारी यासाठी काम करतील, असा माझा आग्रहच नाही तर सूचना आहे. विद्यार्थी परीक्षेत आल्यानंतर कोणत्याही दडपणात राहू नयेत’, अशी सरकारची भूमिका असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

MPSC Exam new Dates : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा,परीक्षा 8 दिवसात

(BJP leader chandrashekhar bawankule on MPSC exam)

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI