CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live | फडणवीसांच्या टीकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (बुधवार, 21 ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. (CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live Update)

CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live | फडणवीसांच्या टीकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही : उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 21, 2020 | 3:51 PM

उस्मानाबाद : “नुकसानग्रस्तांनी स्वत: ला एकटे समजू नका, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे,” असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिले. राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (बुधवार, 21 ऑक्टोबर) उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा करत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट दिली. त्यावेळी शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधला. (CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live Update)

?LIVE UPDATE? 

[svt-event title=”शेतकऱ्यांना मदत करणारच – मुख्यमंत्री” date=”21/10/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ] शेतकरी संकटात आहे , घरे वाहून गेली ही माहिती अतिवृष्टी होताना प्रत्येक मिनिटाला मिळाली. जीवितहानी टाळणे किंवा कमी कशी होईल याकडे लक्ष. मदत केल्याशिवाय सरकार गप्प राहणार नाही. नुकसान व रक्कम याचा आढावा सुरू आहे. जनता व शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे , फडणवीस यांच्या टीकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. [/svt-event]

[svt-event title=”पैशाचं सोंग आणता येत नाही – मुख्यमंत्री ” date=”21/10/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ] जे करू ते ठोस करू , मुंबईत यावर काम सुरू आहे. दसरा दिवाळी सण आहेत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नाहीत. पैशाचे सोंग आणता येत नाही gst चे पैसे आले नाहीत , केंद्र हक्काचे पैसे आले नाहीत [/svt-event]

[svt-event title=”यशाची शिखरं सर करताना, पाया का ठिसूळ होतोय त्याचा विचार करा : मुख्यमंत्री” date=”21/10/2020,3:40PM” class=”svt-cd-green” ] यशाची शिखरं सर करताना, पायाखालची जमीन, मुळं का निसटत आहेत त्याचा विचार करावा, एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. स्पष्टवक्त लढवय्ये खडसे आहेत त्यांचे महाविकास आघाडीत स्वागत. भाजपने विचार करावा पाळेमुळे रोवणारी माणसे सोडून जात आहेत. यशाची शिखरे पादाक्रांत करताना पायाचे दगड ठिसूळ का होतात यावर विचार भाजपने करावा – मुख्यमंत्री [/svt-event]

[svt-event title=”फडणवीसांच्या टीकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही : उद्धव ठाकरे ” date=”21/10/2020,3:39PM” class=”svt-cd-green” ] शेतकरी संकटात आहे , घरे वाहून गेली ही माहिती अतिवृष्टी होताना प्रत्येक मिनिटाला मिळाली. कमीत कमी जीवित हानी होऊ देण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे. मदत केल्याशिवाय सरकार राहणार नाही. नुकसान व रक्कम याचा आढावा सुरू आहे. जनता व शेतकऱ्यांचे प्रश्न महत्वाचे , फडणवीस यांच्या टिकेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. जे करू ते ठोस करू , मुंबईत यावर काम सुरू आहे [/svt-event]

[svt-event title=” धीर सोडू नका, हे सरकार तुमचचं आहे : उद्धव ठाकरे ” date=”21/10/2020,11:29AM” class=”svt-cd-green” ] तुम्ही मोठ्या आशेने अपेक्षेने भेटीला आला आहात, जे मी बोलतो ते करतो. जे बोलत नाही ते करतही नाही. मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो. आकडे सांगायला आलो नाही. त्यामुळे धीर सोडू नका, खचून जाऊ नका, हे सरकार तुमचचं आहे, मी फक्त तुम्हाला दिलासा द्यायला आणि आशीर्वाद घ्यायला आलो आहे, असे उद्धव ठाकरे शेतकर्यांना धीर देताना म्हणाले. [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर,  ” date=”21/10/2020,11:18AM” class=”svt-cd-green” ] उद्धव ठाकरे हे काही वेळापूर्वीच काटगावमध्ये दाखल झाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांसमोरच एका शेतकरी महिलेने हंबरडा फोडला. [/svt-event]

[svt-event title=”नुकसानग्रस्तांनी स्वत: ला एकटे समजू नका – उद्धव ठाकरे” date=”21/10/2020,11:17AM” class=”svt-cd-green” ] नुकसानग्रस्तांनी स्वत: ला एकटे समजू नका, राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांना दिले [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काटगावकडे रवाना ” date=”21/10/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काटगावकडे रवाना, नुकसानाची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे उस्मानाबादेत  [/svt-event]

[svt-event title=”मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल” date=”21/10/2020,10:26AM” class=”svt-cd-green” ] उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापुरात दाखल, सोलापूरहून उस्मानाबादेकडे रवाना  [/svt-event]

परतीच्या पावसाने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. तसेच शेतीचंही मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी सोमवारी (19 ऑक्टोबर) सोलापूरचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी सोलापुरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 25 हजार रुपये मदतीचे चेक दिले होते. मात्र ही तात्पुरत्या स्वरुपाची मदत न देता भरघोस मदत द्या, अशी मागणी बळीराजा करत आहे.

मुख्यमंत्र्यांचा उस्मानाबाद दौरा कसा असेल?

सकाळी 9.30 वाजता – सोलापूर शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने काटगावकडे (ता. तुळजापूर जि. उस्मानाबाद) प्रयाण

सकाळी 10.15 वाजता – काटगाव येथे आगमन, अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांची पाहणी आणि शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी

सकाळी 10.30 वाजता – काटगाव येथून तुळजापूर मार्गे अपसिंगा (ता. तुळजापूरकडे) प्रयाण

सकाळी 11.15 वाजता – अपसिंगा येथे आगमन आणि अतिवृष्टीमुळे घरांची पडझड, शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी

सकाळी 11.35 वाजता – अपसिंगा येथून तुळजापूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण, तुळजापूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन आणि राखीव

दुपारी 12.20 वाजता – पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा आणि अभ्यागतांच्या भेटी राखीव

मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा

अतिवृष्टीचे संकट टळेपर्यंत नुकसानभरपाईसंदर्भात कोणताही निर्णय घाईने घेतला जाणार नाही. सध्या आम्ही माहिती घेण्याचे काम करत आहोत. विविध भागांत नुकसानीचे पंचनामेही सुरु आहेत. या सगळ्याचा अंदाज घेतल्यानंतर प्रत्यक्ष मदत जाहीर केली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सोलापूरच्या अतिवृष्टीग्रस्तांची पाहणी केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नुकसानग्रस्त शेतकरी, घरांची पडझड झालेले नागरिक यांच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे राहील. कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. तुम्हाला दिलासा देण्यासाठी आम्ही आलो आहोत. तुम्ही सुरक्षित रहा, तुमची काळजी शासन घेईल, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा दिला. (CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live Update)

संबंंधित बातम्या : 

सोलापुरात चेक वाटप, उस्मानाबादमध्ये काय? मुख्यमंंत्री उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याकडे नुकसानग्रस्तांचं लक्ष

मदत मागितली बिघडलं कुठं?; केंद्रातील सरकार हे परदेशातील सरकार नाही; मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना टोला

Non Stop LIVE Update
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.