पोस्ट कोव्हिडचा नवीन प्रकार गंभीर, मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं अलर्ट

राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा त्यामुळे दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

पोस्ट कोव्हिडचा नवीन प्रकार गंभीर, मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं अलर्ट

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आज जनतेशी संवाद साधून आता दिवाळीनंतर (Diwali) अधिक काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी वाढली. त्यामुळे आता अधिक काळजी घ्यावी लागणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी पोस्ट कोव्हिड – 19 चा (covid -19) धोका वाढला असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे कोरोनाची (Cororna) पुढील लाट ही लाट नसून त्सुनामी असण्याची शक्यता व्यक्त केली. अशात नागरिकांनी गाफिल राहू नये आणि हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे आणि मास्क लावणे अशा नियमांचं पालन करावं, असंही आवाहन केलं. (CM Uddhav Thackeray speech corona update New type of post covid serious CM alerted the public)

काय आहे पोस्ट कोव्हिड?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना होऊन गेल्यानंतरही त्याचे दुष्परिणाम दिसतात. यामध्ये मेंदू, किडनी, फुफ्स्सावर गंभीर परिणाम होतो. इतकंच नाही तर यामुळे अनेक गंभीर आजार होण्याचाही धोका असतो. त्यामुळे काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. लॉकडाऊन काढण्यात आलं असलं तरी कोरोनाचा धोका अद्याप कामय आहे. राज्यातील कोरोनाचा वाढता आकडा त्यामुळे दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले.

‘कशासाठी विषाची परीक्षा घ्यायची’

दरम्यान, काही लोक नियमांचं उल्लंघन करून विषाची परीक्षा घेत आहेत. काही लोक मास्क न घालता फिरत आहेत. त्यामुळे मी तुमच्यावर नाराज असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ‘मंदिरं खुली झाली म्हणून गर्दी करणं टाळा. कोरोनाचं संकट नाहीसं झालं असं समजू नका. कारण, पाश्चिमात्य देशात कोरोनाची लाट गांभीर्याने घेतली आहे. अहमदाबादमध्ये रात्रीचा कर्फ्यूदेखील लावण्यात आला आहे. दिल्लीतही कोरोनाची भीषण परिस्थिती आहे.’ त्यामुळे प्रत्येकानं काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

“मी तुमच्यावर नाराज आहे. अनेक लोक मास्क न घालता फिरत आहे. गर्दी करत आहेत. आपण शाळा उघडू शकलो नाही. निर्णय घेतला पण उघडू शकलो नाही, कारण प्रश्नांकित आहे. उद्या मुलं आजारी पडू नये याची काळजी आहे. काहीजण म्हणतात हे उघडा, ते उघडा, मात्र ते या महाराष्ट्राची जबाबदारी घेणार आहेत का?” असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

‘पुन्हा लॉकडाऊनकडे जायचं नाही’

उद्धव ठाकरे म्हणाले, “काही लोक मला रात्रीचा कर्फ्यू करण्याचं सूचवत आहेत. पण सर्व गोष्टी कायदे करुन होणार नाही. आपणच आपली जबाबदारी पाळली पाहिजे. दिवाळीत आपण फटाकेबंदी केली नाही, पण आपण फटाके फोडले नाहीत. त्यासाठी कायदे करण्याची गरज पडली नाही. कोरोनाचे संकट संपलेलं नाही. कोरोनाच्या आधीच्या परिस्थितीचा विचार करता आगामी कोरोना साध त्सुनामी असेल की काय असं वाटत आहे.” (CM Uddhav Thackeray speech corona update New type of post covid serious CM alerted the public)

“आपण एका वळणावर आलेलो आहोत. पुन्हा लॉकडाऊनकडे जायचं नाही. आपण एका वळणावर असल्याने आपल्या हालचालींवर आपण नियंत्रण ठेवायला हवं. व्हॅक्सीन येईल तेव्हा येईल, सध्या आपण काळजी घ्यायला हवी,” असंही उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

इतर बातम्या – 

राजकारण करायचं नाही, सगळं सुरू करतो, जबाबदारी घेता का?; मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावले
CM Uddhav Thackeray | आता येणारी कोरोनाची लाट नसून त्सुनामी, काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

(CM Uddhav Thackeray speech corona update New type of post covid serious CM alerted the public)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *