AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजनेही मला फोन करुन सूचना दिल्या, त्याबद्दल धन्यवाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरेंनी महाविकासआघाडी सरकारमधील सर्व नेत्यांसह विरोधी पक्ष, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभार (CM Uddhav Thackeray On Corona)  मांडले.

राजनेही मला फोन करुन सूचना दिल्या, त्याबद्दल धन्यवाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
| Updated on: Mar 29, 2020 | 3:12 PM
Share

 मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत (CM Uddhav Thackeray On Corona)  आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी महाविकासआघाडी सरकारमधील सर्व नेत्यांसह विरोधी पक्ष, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे आभार मांडले. सरकारने 24 तास जीवनावश्यक वस्तूंची दुकान सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जर या वस्तूंच्या दुकानात गर्दी कमी झाली नाही. तर सरकारला कठोर पावलं उचलावी लागतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

घराबाहेर पडू नका असं सांगणारा माणूस पुन्हा एकदा (CM Uddhav Thackeray On Corona)  तुमच्या समोर आला आहे. आज जवळपास आठ दिवस होत आले. संपूर्ण देश लॉकडाऊन आहे. या संपूर्ण दिवसांमध्ये आपण आपल्या संयमांचं अतुलनीय दर्शन घडवलं आहात, त्यामुळे आपलं धन्यवाद, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“राज सुद्धा मला फोन करुन सूचना देतो आहे. हे सर्व आपण एकत्र येऊन काम करुया या भावनेने एकत्र आले आहेत. त्यामुळे या सर्वांनी मी धन्यवाद देतो,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“जेव्हा मी आपल्याशी बोलत असतो तेव्हा एक लक्षात घ्या. माझ्यासोबत आपण सर्व आहात. माझ्यासोबत महाविकासआघाडी सरकारमधील सर्व नेते आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे सर्व आहेत. विरोधीपक्ष नेत्यांशी देखील माझी चर्चा सुरु आहे. या सर्वांचे धन्यवाद, “असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“सर्व कामगार आपल्या घऱी जाण्यासाठी उतावळे झाले आहेत. पण इतर राज्यातील मजूर, कर्मचाऱ्यांनी जिथे आहे तिथेच थांबावे. त्यांच्यासाठी राहण्याची, मोफत जेवणाची महाराष्ट्र सरकार सोय करत आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“साखर कारखान्यांनी आपल्या कामगारांची सोय करावी. एका जिल्ह्यातून दुसरीकडे वाहतूक बंद करा. जीवनावश्यक वस्तू 24 तास सुरु आहेत,  पण विनाकारण पोलिसांवर ताण वाढवू नका,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“सरकार आपली मदत करत आहे, आपणही सरकारची मदत करा. केंद्राकडूनही चांगली मदत होत आहे. तसेच पुण्यातील डॉक्टरांचं कौतुक आहे. सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा, त्यांच्याशी बोलून माझं मनोधैर्य वाढतं,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होत आहेत, ही समाधानाची बाब, पण आता न्युमोनियाचे रुग्ण वाढण्याची शक्यताही उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray On Corona)  वर्तवली.”

“हे संकट मोठं आहे. याला लढण्यासाठी आपण एक वेगळे अकाऊंट तयार केले आहे. अनेकजण स्वत: हून पुढे येऊन सरकारला मदत करत आहे. कोणता देश कोणाच्या मदतीला धावून येईल माहीत नाही. आपण आपल्यासाठी मदत करायाला पाहिजे आहे. इतर देशांची अवस्था पाहून आपण आपल्या देशात काळजी घेत आहोत,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

“प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडा. केंद्र सरकार आपल्या संपर्कात आहे. केंद्राने ज्या योजना जाहीर केल्या आहे त्या आपण राज्यात राबवणार आहे. आपण जी केंद्र सुरु केली आहेत. तिथे आपण सर्वांना मोफत जेवण देत आहे. शिवभोजन आपण 10 रुपयांना देत होतो. मात्र आता ते आपण 5 रुपयांनी देत आहोत,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“आज रविवार सुट्टीचा दिवस आहे. पण पुढचे काही दिवस आपल्याला जबरदस्तीची सुट्टी घेऊन घरी राहायचे आहे. पण या सुट्टीच्या दिवशीही डॉक्टर आपल्यासाठी काम करत आहेत,” असेही ते म्हणाले.

“आपण चाचणी केंद्र वाढवत आहोत. त्यामुळे आता रुग्णांची ही अपेक्षेप्रमाणे वाढ होत आहे. आता कदाचीत न्युमोनियाचे रुग्ण वाढतील. आता आपल्याला डोळ्यात तेल घालून काम करावे लागेल. ज्यांना ताप, सर्दी खोकला झाला असेल तर त्यांची ताबडतोब तपासणी करावी आणि तातडीने त्यांच्यावर उपचार सुरु करावा,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“हा आजार पहिल्या पयारीवर थांबवला तर तो पुढे वाढत नाही. काही हजारो प्रवाशांना आपण क्वारंटाईनमध्ये ठेवले आहे.  गरोदर, वृद्ध, मधुमेह आणि लहान मुलांची काळजी घ्या. त्यांच्यामध्ये तीव्र लक्षण आढळून येत आहेत. गुणाकाराचा काळ आता सुरु झाला आहे. या काळात आपल्याला वजाबाकी करायची आहे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

“सर्व बाजूने यंत्रणा सुसज्ज आहे. जर या लढाईत पुढचे पाऊल टाकावे लागले. त्यासाठी आपण सज्ज आहोत. तुम्ही घराबाहेरचे टेन्शन घेऊ नका तुम्ही घरात रहा. आपण सगळे मिळून आपण आपले काम करा, कुटुंबासोबत हसत खेळत कॅरम, चेस, गाण्याच्या भेंड्या खेळा,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.