AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मोठी बातमी! महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?
विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 02, 2026 | 10:26 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पुणे मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर अमरावती शिक्षक मतदार संघामधून अपेक्षेप्रमाणे आदिती पोहोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.  राज्यात सध्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यामध्ये आता काँग्रेसने आघाडी घेतल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसकडून विधान परिषद  निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये नागपूर पदवीधर मतदार संघासाठी पुन्हा एकदा अभिजीत वंजारी यांनाच संधी देण्यात आली आहे. तर पुणे मतदारसंघातून जयंत आसगावकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दुसरीकडे अमरावती शिक्षक मतदार संघामधून आधीच आदिती पोहोरे यांचं नाव जवळपास निश्चित झालं होतं. उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची फक्त औपचारिक घोषणाच बाकी होती. याबाबत काँग्रेस नेत्या यशमती ठाकूर यांनी आधीच संकेत दिले होते. शेवटी अमरवाती शिक्षक मतदारसंघासाठी आदिती पोहोरे यांचं नाव जाहीर करण्यात आलं आहे.

कोण आहेत आदिती पोहोरे?

प्रा. अदिती पोहरे यांनी अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून एम.ई. (स्ट्रक्चरल डिझाईन) आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम.ए. (मानसशास्त्र) पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली आहे. 6 डिसेंबर रोजी विद्यमान आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ संपत आहे. या शिक्षक मतदारसंघात लवकरच निवडणूक होणार आहे. त्यासाठी आता काँग्रेसच्या वतीने आदिती पोहरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपमध्ये रस्सीखेच 

दरम्यान दुसरीकडे मात्र अजूनही महायुतीमध्ये जागा वाटपावरून रस्सीखेच सुरू असल्याचं दिसून येत आहे. पुण्याच्या दोन्ही जागेवर पदवीधर आणि शिक्षक मतदार संघावर भाजपकडून दावा करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुण्याच्या पदवीधर तर शिवसेना शिंदे गटाकडून शिक्षक मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या जागा महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा