AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माढ्यात आघाडीला दणका, काँग्रेस आमदाराचा भावासह भाजपला पाठिंबा

सातारा : माढा लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. विशेष म्हणजे भाजपला राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांकडूनच मदत होत आहे. अगोदर मोहिते पाटील कुटुंब, नंतर निंबाळकर कुटुंब, काँग्रेसचे कल्याण काळे आणि आता गोरे बंधूंनीही भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांनी पक्षाला रामराम करत माढा लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं […]

माढ्यात आघाडीला दणका, काँग्रेस आमदाराचा भावासह भाजपला पाठिंबा
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

सातारा : माढा लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. विशेष म्हणजे भाजपला राष्ट्रवादी आणि काँग्रेस नेत्यांकडूनच मदत होत आहे. अगोदर मोहिते पाटील कुटुंब, नंतर निंबाळकर कुटुंब, काँग्रेसचे कल्याण काळे आणि आता गोरे बंधूंनीही भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे शेखर गोरे यांनी पक्षाला रामराम करत माढा लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनीही राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर टीका करत माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनाच मदत करणार असल्याचा ठाम निर्धार केलाय.

वाचा – सोलापूर, माढ्यात भाजपची ताकद आणखी वाढली, काँग्रेस नेत्याचा भाजपप्रवेश

जयकुमार गोरे हे सातारा जिल्ह्यातील माणचे आमदार आहेत. गोरे बंधूंच्या या निर्णयामुळे आघाडीचे सर्व समीकरणे बिघडली आहेत. यावेळी आमदार जयकुमार गोरेंसह त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांनी महायुतीला पाठिंबा असल्याचं हात वर करुन सांगितलं. यावेळी गोरे म्हणाले, “ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही, आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन एकापाठोपाठ एक खोटे गुन्हे दाखल केले, वेळोवेळी राष्ट्रवादी काँग्रेसने मला अडचणीत आणले. यामुळे यापुढील काळात माढाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माझा पाठिंबा असेल.”

वाचा – ‘शिंदे घराणं संपवण्यासाठी पवारांकडून संजय शिंदेंना उमेदवारी’

गोरे बंधू यांच्यातला वाद जरी टोकाचा असला तरी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला दोन्ही भावांच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचा माढ्यातील सत्तेचा तिढा आता आणखी वाढलाय. यामुळे राष्ट्रवादीला साताऱ्यामध्ये चांगलाच फटका बसला आहे. या दोघांच्या बंडामुळे आता माण तालुक्याची विधानसभा निवडणुकीची गणितं बदल्याचं राजकीय गोटात बोललं जातंय. परंतु या निर्णयामुळे माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची डोकेदुखी वाढणार आहे. कारण, शरद पवारांनीही माढ्याची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा व विद्यमान आमदार

करमाळा (सोलापूर) – नारायण पाटील (शिवसेना)

माढा (सोलापूर) – बबनराव शिंदे (राष्ट्रवादी)

माळशिरस (सोलापूर) – हनुमंत डोळस (राष्ट्रवादी)

सांगोला (सोलापूर) – गणपतराव देशमुख (शेकाप)

माण (सातारा) – जयकुमार गोरे (काँग्रेस)

फलटण (सातारा) – दीपक चव्हाण (राष्ट्रवादी)

माढ्यासाठी महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. माढ्यासह जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर हातकणंगले अशा एकूण 14 जागांसाठी मतदान होणार आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...