AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prashant Padole Accident : महाराष्ट्रात खासदाराच्या कारला ट्रकची जोरदार धडक, एअर बॅगच उघडली नाही, नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण

Prashant Padole Accident : एअरपोर्टच्या दिशेने निघालेल्या महाराष्ट्रातील काँग्रेस खासदाराच्या कारला आज सकाळी भीषण अपघात झाला. एअरपोर्ट मार्गावर असताना एका ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. पण देव बलवत्तर असल्याने त्यांचे प्राण वाचले.

Prashant Padole Accident : महाराष्ट्रात खासदाराच्या कारला ट्रकची जोरदार धडक, एअर बॅगच उघडली नाही, नशीब बलवत्तर म्हणून वाचले प्राण
MP prashant padole
| Updated on: Mar 30, 2026 | 10:19 AM
Share

महाराष्ट्रातील भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोले कार अपघातात जखमी झाले आहेत. खासदार डॉ. प्रशांत पडोले आपल्या कारने नागपूर एअरपोर्टच्या दिशेने चालले असताना हा अपघात झाला. अपघातात काँग्रेस खासदारांसह त्यांचा ड्रायव्हर जखमी झाला आहे. दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरु आहे. त्यात सहभागी होण्यासाठी डॉ. प्रशांत पडोले चालले होते. सध्या डॉ. प्रशांत पडोले आणि त्यांच्या ड्रायव्हरला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. याआधी 2025 साली सुद्धा प्रशांत पडोले रस्ते अपघातात जखमी झाले होते. त्यावेळी सुद्धा सुदैवाने त्यांचे प्राण वाचले होते.

काँग्रेस खासदार डॉ. प्रशांत पडोले सोमवार सकाळी आपल्या कारने नागपूर एअरपोर्टच्या दिशेने निघाले होते. एअरपोर्ट मार्गावर असताना एका ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन या अपघाताची माहिती दिली. त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना टॅग केलं. “खासदार सुरक्षित नाही, तिथे जनतेचं काय होणार?. आज दिल्लीला जायचं होतं. सकाळी भंडाऱ्यावरुन खासगी कार घेऊन नागपूर एअरपोर्टच्या दिशेने निघालो होतो. नागपूर जवळ असताना ट्रकने जोरदार धडक दिली. मला कुठे लागलं नाही. पण कारचं नुकसान झालं”

दुचाकीची लिफ्ट घेऊन नागपूरला पोहोचले

खासदार डॉ. प्रशांत पडोले यांच्या कारमधील एअर बॅग उघडली नाही, त्यावरही प्रश्चचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी एक्सवर नुकसानग्रस्त कारचा फोटो शेअर केला. अपघातानंतर एअरबॅग उघडली पाहिजे होती. पण माझ्यासोबत असं झालं नाही असं त्यांनी लिहिलय. किरकोळ दुखापत झाल्यानंतर खासदार प्रशांत पाडोले एका दुचाकीची लिफ्ट घेऊन नागपूरला पोहोचले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नागपूर विमान तळावर पोहोचले आणि दिल्लीला रवाना झाले. विशेष म्हणजे याच मार्गावर यापूर्वीही दोनदा अपघात झाल्याने हा तिसरा प्रसंग ठरला आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात असून, घटनेची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे.

कोण आहेत डॉ. प्रशांत यादराव पडोले?

डॉ. प्रशांत यादराव पडोले हे महाराष्ट्रातील भंडारा-गोंदियामधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सक्रिय सदस्य आहेत. 45 वर्षाच्या डॉ.पडोले यांनी कृषी आणि वैद्यकीय क्षेत्रात स्वत:ची ओळख बनवली आहे. त्यांनी 2002 साली युक्रेनच्या ओडेसा स्टेट युनिवर्सिटीमधून एमडीची (मेडिसिन) डिग्री प्राप्त केली. वर्तमानात यादवराव रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी सुद्धा वैद्यकीय अधिकारी आहे. त्यांचं स्वत:हच हॉस्पिटल आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...