AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Congress Candidate List : लोकसभेत महायुतीला महाराष्ट्रात धूळ चारणाऱ्या काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकरवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एकूण 102 जागांवर निवडणूक लढवत आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे राज्यातील काँग्रेस नेत्यांना विधानसभेतही आपल्याला तसंच यश येईल, अशी आशा आहे. त्यामुळेच काँग्रेसने मविआच्या जागावाटपात अनेक जागांवरचा दावा सोडला नाही. शेवट चर्चेअंती काँग्रेसला 102 जागा मिळाल्या. या सर्व जागांवरील उमेदवारांची यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत.

Maharashtra Congress Candidate List : लोकसभेत महायुतीला महाराष्ट्रात धूळ चारणाऱ्या काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची यादी, वाचा एका क्लिकरवर
नाना पटोले
| Updated on: Nov 14, 2024 | 6:34 PM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यात प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळत आहे. प्रत्येक पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी हे सुद्धा महाराष्ट्रात प्रचारसभा घेत आहेत. सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वाधिक यश मिळाल्याने राज्यातील काँग्रेस नेत्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 13 जागांवर यश मिळालं होतं. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीतही आपल्याला तसंच यश मिळेल, अशी काँग्रेस नेत्यांना आशा आहे. विशेष म्हणजे याचसाठी काँग्रेसने जागावाटपावेळी अनेक जागांवरचा दावा सोडला नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला होता. अखेर महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक 102, शिवसेना ठाकरे गट 89, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट 87 आणि मित्र पक्ष 6 असा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. काँग्रेसच्या सर्व उमेदवारांची नावे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काँग्रेसच्या 102 उमेदवारांची यादी :

  1. अक्कलकुवा (ST) – ॲड के.सी. पाडवी
  2. शहादा (अ.जा.)- राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
  3. नंदुरबार (ST)- किरण दामोदर तडवी
  4. नवापूर (ST) – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक
  5. साक्री (ST)- प्रवीण बापू चौरे
  6. धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील
  7. रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
  8. मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे
  9. चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
  10. रिसोड – अमित सुभाषराव झनक
  11. धामणगाव रेल्वे – प्रा. वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
  12. अमरावती – डॉ सुनील देशमुख
  13. तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
  14. अचलपूर – अनिरुद्ध बबलूभाऊ सुभानराव देशमुख
  15. देवळी – रणजित प्रताप कांबळे
  16. नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे
  17. नागपूर मध्य – बंटी बाबा शेळके
  18. नागपूर पश्चिम – विकास पी ठाकरे
  19. नागपूर उत्तर (SC)- डॉ नितीन काशिनाथ राऊत
  20. साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पाटोळे
  21. गोंदिया – गोपालदास शंकरलाल अग्रवाल
  22. राजुरा – सुभाष रामचंद्रराव ढोले
  23. ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
  24. चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर
  25. हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
  26. भोकर – तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
  27. नलगे- मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
  28. पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर
  29. फुलंब्री – विलास केशवराव औताडे
  30. मीरा भाईंदर – सय्यद मुझफ्फर हुसेन
  31. मालाड पश्चिम – अस्लम आर शेख
  32. चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान
  33. धारावी (SC)- डॉ ज्योती एकनाथ गायकवाड
  34. मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल
  35. पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
  36. भोर – संग्राम अनंतराव थोपटे
  37. कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
  38. संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात
  39. शिर्डी – प्रभावती जे घोगरे
  40. लातूर ग्रामीण – धीरज विलासराव देशमुख
  41. लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
  42. अक्कलकोट – सिद्धाराम सतलिंगप्पा म्हेत्रे
  43. कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
  44. कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील
  45. करवीर – राहुल पांडुरंग पाटील
  46. हातकणंगले (SC)- राजू जयंतराव आवळे
  47. पलूस-कडेगाव – डॉ विश्वजीत पतंगराव कदम
  48. जत – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत
  49. भुसावळ-अनुसूचित जाती – डॉ. राजेश तुकाराम मानवटकर
  50. जळगाव (जामोद) – डॉ. स्वाती संदिप वाकेकर
  51. अकोट – महेश गंगणे
  52. वर्धा – शेखर प्रमोदबाबू शेंडे
  53. सावनेर – अनुजा सुनील केदार
  54. नागपूर दक्षिण – गिरीश कृष्णराव पांडव
  55. कामठी – सुरेश यादवराव भोयर
  56. भंडारा (SC)- पूजा गणेश ठवकर
  57. अर्जुनी-मोरगाव (SC)- दलीप वामन बनसोड
  58. आमगाव (ST)- राजकुमार लोटूजी पुरम
  59. राळेगाव – प्रा.वसंत चिंदुजी पुरके
  60. यवतमाळ – अनिल बाळासाहेब शंकरराव मांगुळकर
  61. आर्मी-एसटी – जितेंद्र शिवाजीराव मोघे
  62. उमरखेड-अनुसूचित जाती – साहेबराव दत्तराव कांबळे
  63. जालना – कालियास किसनराव गोरंट्याल
  64. औरंगाबाद पूर्व – लहू एच. शेवाळे (मधुकर कृष्णराव देशमुख बदली)
  65. वसई – विजय गोविंद पाटील
  66. कांदिवली पूर्व – कालू बधेलिया
  67. चारकोप – यशवंत जयप्रकाश सिंह
  68. सायन कोळीवाडा – गणेशकुमार यादव
  69. श्रीरामपूर-अनुसूचित जाती – हेमंत ओगले
  70. निलंगा – अभयकुमार सतीशराव साळुंखे
  71. शिरोळ – गणपतराव आप्पासाहेब पाटील
  72. खामगाव – राणा दलीपकुमार सनदा
  73. मेळघाट-एसटी – डॉ. हेमंत नंदा चिमोटे
  74. गडचिरोली-ST – मनोहर तुळशीराम पोरेटी
  75. दिग्रस – माणिकराव ठाकरे
  76. नांदेड दक्षिण – मोहनराव मारोतराव अंबाडे
  77. देगलूर-अनुसूचित जाती – निवृत्तीराव कोंडीबा कांबळे
  78. मुखेड – हणमंतराव वेंजकतराव पाटील बेटमोगरेकर
  79. मालेगाव सेंट्रल – एजाज बेग अजिज बेग
  80. चांदवड – शिरीषकुमार वसंतराव कोतवाल
  81. इगतपुरी-ST – लकीभाऊ भिका जाधव
  82. भिवंडी पश्चिम – दयानंद मोतीराम चोरघे
  83. अंधेरी पश्चिम – अशोक जाधव (सचिन सावंत बदली)
  84. वांद्रे पश्चिम – आसिफ झकेरिया
  85. तुळजापूर – कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील
  86. कोल्हापूर उत्तर – मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती (राजेश भरत लाटकर यांची बदली)
  87. सांगली – पृथ्वीराज गुलाबराव पाटील
  88. अमळनेर – डॉ. अनिल नथ्थू शिंदे
  89. उमरेड-अनुसूचित जाती – संजय नारायणराव मेश्राम
  90. आरमोरी-ST – रामदास मसराम
  91. चंद्रपूर-अनुसूचित जाती – प्रवीण नानाजी पाडवेकर
  92. बल्लारपूर – संतोषसिंग चंदनसिंग रावत
  93. वरोरा – प्रवीण सुरेश काकडे
  94. नांदेड उत्तर – अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
  95. नालासोपारा – संदीप पांडे
  96. शिवाजीनगर – दत्तात्रय बहिरट
  97. पुणे कॅन्टोन्मेंट एससी – रमेश आनंदराव भागवे
  98. सोलापूर दक्षिण – दिलीप ब्रह्मदेव माने
  99. पंढरपूर – भगीरथ भालके
  100. अकोला पश्चिम – साजिद खान मन्नान खान
  101. कुलाबा – हीरा देवासी
  102. सोलापूर शहर मध्य – चेतन नरोटे
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.