राज्याच्या राजकारणात खळबळ! पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? तारीखही समोर; पडद्यामागे प्रचंड घडामोडी

काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी राष्ट्रवादीच्या पवार गटाला काँग्रेसचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तशी माहिती मिळाली आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती समोर आल्याने आता हालचाली वाढल्या आहेत.

राज्याच्या राजकारणात खळबळ! पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार? तारीखही समोर; पडद्यामागे प्रचंड घडामोडी
ncp merger with congress and sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2026 | 8:37 PM

NCP Merger In Congress : पश्चिम बंगालच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. कधीकाळी बंगालमध्ये सत्तेत असणारा तेथील माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाची शकलं झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एकूण 80 आमदारांपैकी 50 पेक्षा जास्त आमदारांनी ममता बॅनर्जींची साथ सोडली आहे. 19 खासदारांनही वेगळा गट स्थापन केला आहे. दरम्यान, आता ममता बॅनर्जी यांचा उरलेला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही काँग्रेस पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.

राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?

सध्या राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांची राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षात पडद्यामागे बरंच काही चालू असल्याचं बोललं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठी राष्ट्रवादीच्या पवार गटाला काँग्रेसने प्रस्ताव पाठवला आहे. तशी माहिती मिळाली आहे. विरोधकांची मोट बांधण्यासाठी काँग्रेस आग्रही असल्याचे सांगितले जात आहे.

तृणमूल काँग्रेसनंतर आता काँग्रेसने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाही तसा प्रस्ताव दिला आहे.  विशेष म्हणजे शरद पवार यांची राष्ट्रवादीदेखील या विलीनीकरणासाठी अनुकूल असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.  काही दिवसांपूर्वी पवार गटाच्या एका बड्या नेत्याने महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या बड्या नेत्याबरोबर विलिनाकरणासंदर्भात केली होती चर्चा. या चर्चेबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु विलीनीकरणावर दोन्ही बाजूने चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. विलीनीकरण करायचे की नाही, याबाबत आता येणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सुप्रिया सुळे यांचे सूचक विधान

दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेसची विचारधारा असणाऱ्याने देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं, काँग्रेसला मजबूत करावं, अशी भूमिका घेतली होती. यावर शरद पवार यांच्य्या पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या या मताचा मी आदर करते. परंतु हे कधी शक्य होईल हे आगामी काळातच समजेल, अशा आशयाचे विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे. त्यामुळे सुळे यांच्या विधानानंतरही राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधील विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ :

Follow Us