AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांच्या राष्ट्रवादीचं आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण? सुप्रिया सुळेंच्या सूचक विधानाने खळबळ, म्हणाल्या…

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस हा पक्ष अधिक मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेसमधून निघालेले लहान पक्ष, नेते यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. त्यानुसार मजबूत अशी, अखंड अशी काँग्रेस देशात उभी राहायला पाहिजे, असे राऊत म्हणाले.

पवारांच्या राष्ट्रवादीचं आता काँग्रेसमध्ये विलिनीकरण? सुप्रिया सुळेंच्या सूचक विधानाने खळबळ, म्हणाल्या...
sharad pawar and supriya suleImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 11, 2026 | 4:51 PM
Share

NCP Merger In Congress : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस या पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देणारा एक विचार समोर मांडला आहे. काँग्रेसचीच विचारधारा असणारे परंतु राज्यांमध्ये वेगळे अस्तित्त्व असलेल्या सर्व स्थानिक पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावे, काँग्रेसला मजबूत करावे, असे संजय राऊत म्हणाले आहेत. विशेष म्हणजे या मोहिमेचे नेतृत्त्व खासदार शरद पवार यांनी करावे, असेही राऊत म्हणाले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही काँग्रेसच्या झेंड्याखाली यावे, असे विधान केले आहे. दरम्यान, आता राऊतांच्या या विचारावरच खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानानंतर आता भविष्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनकरण होणार का? असे विचारले जात आहे.

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

संजय राऊत यांनी मांडलेल्या विचारावर सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आले. यावर सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान केले आहे. संजय राऊत हे माझ्यासाठी मोठ्या भावाप्रमाणे आहेत. त्यांनी दिलेल्या सल्ल्याचा आदर आहे. त्यांनी चांगला सल्ला दिला आहे. परंतु आता हे सगळं कधी होईल, कसे होईल ते येणारा काळच सांगेल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. म्हणजेच आगामी काळात शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसच्या झेंड्याखाली येऊन काम करू शकतो, असा अंदाज सुळे यांच्या विधानानंतर लावला जात आहे. त्यांनी अगोदर शिवसेना पक्ष फोडला, राष्ट्रवादी पक्ष फोडला आता तृणमूल काँग्रेस पक्षाला तोडण्यात येत आहे. त्यामुळेच आम्ही तृणमूल काँग्रेससोबत आहोत, असेही सुप्रिया सुळे म्हणाले.

संजय राऊत नेमकंं काय म्हणाले होते?

संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. “काँग्रेस हा पक्ष अधिक मजबूत व्हायला पाहिजे. काँग्रेसमधून निघालेले लहान पक्ष, नेते यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे. त्यानुसार मजबूत अशी, अखंड अशी काँग्रेस देशात उभी राहायला पाहिजे. शरद पवार यांनी याबाबत पुढाकार घ्यायला पाहिजे. एकत्र येण्याची जी भूमिका बनत आहे, त्याचे नेतृत्त्व शरद पवार यांनी केले तर ही मोहीम खूप पुढे जाईल,” असे थेट विधान संजय राऊत यांनी केले.

राऊत राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले?

तसेच, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही त्यांनी भाष्य केले. राष्ट्रवादी तसेच इतर पक्ष काही कारणामुळे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. परंतु आज ते पक्ष काँग्रेसोबत काम करत आहेत. सरकारमध्येही ते पक्ष सोबत असतात. हा विचार सगळा एकत्र आला तर नरेंद्र मोदी यांनी लादलेला भ्रष्ट कारभार आहे, त्याला फार मोठे आव्हान उभे करता येईल, असे मत राऊत यांनी म्हटले.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर