AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा पुन्हा काँग्रेसला धक्का, बडा नेत्याचा भाजप प्रवेश होणार

lok sabha election 2024: गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढली आहे. 9 इच्छुकांनी मुलाखती देण्याचा सोपस्कार पार पाडला होता. त्यानंतर माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान, तसेच डॉ. नितीन कोडवते या तिघांमध्ये स्पर्धा होती.

भाजपचा पुन्हा काँग्रेसला धक्का, बडा नेत्याचा भाजप प्रवेश होणार
डॉ. नितीन कोडवते
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Mar 22, 2024 | 11:09 AM
Share

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा विदर्भातून सुरु होत आहे. या निवडणुकीचा प्रचार सुरु झाला आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसला बसणारे धक्के कमी होत नाही. माजी मुख्यमंत्री अशोच चव्हाण भाजपात गेले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये सुरु असलेले हे डॅमेज कंट्रोल अजून थांबत नाही. आता काँग्रेसमध्ये प्रदेश सचिव असणारे नितीन कोडवते यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आज ते भाजपात प्रवेश करत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला पुन्हा एकदा भाजपने जोरदार धक्का दिला आहे.

बावनकुळे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

डॉ नितीन कोडवते यांचा काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात करणार प्रवेश करत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती त्यांचा भाजप प्रवेश होत आहे. गुरुवारीच काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. गडचिरोली-चिमूर मतदार संघात उमेदवारी मिळावी, यासाठी नितीन कोडवते स्पर्धेत होते. परंतु या ठिकाणी काँग्रेसने उमेदवार जाहीर केला नाही.

सात जागांवर सोलापूरमधून प्रणिती शिंदे, कोल्हापूरमधून शाहू महाराज छत्रपती, पुणे लोकसभा मतदार संघातून आमदार रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, अमरावतीमधून वळवंत वानखेडे, लातूरमधून डॉ. शिवाजी कलगे, नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे. परंतु काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचे निकटवर्तीय युवा नेते डॉ. नितीन कोडवते यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी भाजप प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.

नितीन कोडवते होते इच्छूक

गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघासाठी काँग्रेसमधील इच्छुकांची संख्या वाढली आहे. 9 इच्छुकांनी मुलाखती देण्याचा सोपस्कार पार पाडला होता. त्यानंतर माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉ.नामदेव किरसान, तसेच डॉ. नितीन कोडवते या तिघांमध्ये स्पर्धा होती. नितीन कोडवते यांच्या पत्नी चंदा कोडवते २०१९साली काँग्रेसच्या विधानसभेच्या उमेदवार होत्या. तसेच नितीन कोडवतेंकडे होती. काँग्रेस प्रदेश सचिवची जबाबदारी होती. परंतु तिकीट न मिळाल्यामुळे नाराज होऊन ते भाजपत गेल्याची चर्चा आहे.

Follow Us
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी...अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत...
राज ठाकरेंना मुख्यमंत्री होण्यासाठी... अमित ठाकरेंच्या इच्छेबाबत भरत गोगावलेंचा थेट पलटवार
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा