भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा, नाना पटोले अकोला येथील रॅलीत सहभागी होणार

| Updated on: Sep 27, 2021 | 1:02 AM

‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्ष सक्रीय सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा, नाना पटोले अकोला येथील रॅलीत सहभागी होणार
bharat bandh congress
Follow us on

मुंबई : तीन कृषी कायदे, कामगारविरोधी कायदे रद्द करावेत या मागण्यांसाठी शेतकरी संघटना व डाव्या पक्षांनी सोमवारी (ता.27) सप्टेंबरला भारत बंद पुकारलेला आहे. या ‘भारत बंद’मध्ये काँग्रेस पक्ष सक्रियपणे सहभागी होत असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. (congress support monday bharat bandh information given by nana patole)

मात्र सरकारला शेतकऱ्यांचा आवाज ऐकायला येत नाही

अकोला येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पटोले म्हणाले की, ‘केंद्रातील मोदी सरकारने लादलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत म्हणून एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी वर्षभरापासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनात जवळपास 500 शेतकऱ्यांचे निधन झाले, परंतु केंद्र सरकारला मात्र या शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही.’

कामगारांचे हक्क व अधिकार काढून घेतले जात आहेत

तसेच, “या काळ्या कृषी कायद्याने देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करुन त्याला भांडवलदाराचे गुलाम बनवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क व अधिकार काढून घेतले जात आहेत. या प्रश्नांवर केंद्र सरकारच्या विरोधात भारत बंदच्या रुपाने एल्गार पुकारलेला आहे,” असेही नाना पटोले म्हणाले.

नाना पटोल अकोला येथील रॅलीत सहभागी होणार

सोमवारच्या भारत बंदमध्ये काँग्रेसच्या राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयात प्रमुख नेते, पक्षाचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. तसेच मी स्वत: अकोला येथील रॅलीत सहभागी होणार आह, असे पटोले यांनी सांगतिले.

दरम्यान, अकोला कुटासा या गावात नाना पटोले यांची संभा होती. याच गावात नाना पटोले यांनी मोठे वक्तव्य केले.  माझं नाव नाना पटोले आहे हे सगळ्यांना माहिती आहे. मी जे बोलतो तेच करतो. दादा पेक्षा नाना मोठा असतो, असे पटोले मिश्किलपणे म्हणाले.

इतर बातम्या :

“पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचं पाणी मराठवाड्यात आणण्याचा प्रयत्न”, पाणी टंचाईवर जयंत पाटलांचा प्लॅन काय ?

नागपुरात भरदिवसा चाकूचा धाक दाखवत 20 लाख लुबाडणाऱ्या चोरट्याला बेड्या, पोलिसांनी कसं पकडलं?

नागपूरकरांची चिंता मिटली, पाणीपुरवठा करणारी दोन्ही धरणे ओव्हरफ्लो

(congress support monday bharat bandh information given by nana patole)