AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन नंबरचे धंदे सुरू करण्यासाठी एस.पी. साहेबांना फोन करा; सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे कोणी केली अजब मागणी ?

अक्कलकोटमध्ये दोन नंबर धंदे सुरू करण्यासाठी एस.पी. साहेबांना फोन करा. आमचा कार्यकर्ता गरीब आहे. त्यांना हा धंदा सोडून दुसरा धंदा जमत नाही, अशी जाहीर मागणी व्यासपीठावरून करण्यात आली आहे. कोणी केली ही मागणी ?

दोन नंबरचे धंदे सुरू करण्यासाठी एस.पी. साहेबांना फोन करा; सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे कोणी केली अजब मागणी ?
| Updated on: Jun 14, 2024 | 8:39 AM
Share

अक्कलकोट हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी असंख्य भाविक नेहमी इथे येत असतात. पण येथूनच एक विचित्र मागणी समोर आली आहे. काँग्रेसचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे अजब मागणी केली आहे. अक्कलकोटमध्ये दोन नंबर धंदे सुरू करण्यासाठी एस.पी. साहेबांना फोन करा. आमचा कार्यकर्ता गरीब आहे. त्यांना हा धंदा सोडून दुसरा धंदा जमत नाही, असे म्हणत म्हेत्रे यांनी व्यासपीठावरून जाहीर मागणी केली आहे. मात्र यामुळे एकच खळबळ माजली असून चर्चा सुरू झाली आहे. एवढंच नव्हे तर अक्कलकोटचे भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना देखील धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. “आता आमचं डोकं खराब झालं आहे. जे काय होईल ते होईल. एक तर तो राहील नाहीतर मी राहील”, अशी थेट धमकी व्यासपीठावरून म्हेत्रे यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना दिली.

शंकर म्हेत्रे हे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे लहान भाऊ असून ते काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात शंकर म्हेत्रे यांनी हे वक्तव्य केले. मात्र त्यांची ही विधानं आणि धमकीमुळे खळबळ माजली असून याप्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. मात्र अशा धमक्यांना आपण भीक घालत नसल्याचे सांगत याबाबत आपण गृहमंत्र्यांकडे तक्रार करणार आहोत, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले शंकर म्हेत्रे ?

अक्कलकोटमध्ये भाजपच्या लोकांचा दोन नंबर धंदा सुरू आहे, मात्र काँग्रेसच्या लोकांचा बंद आहे. याबाबत पोलीस पक्षपातीपणा करत आहेत असा आरोप म्हेत्रे यांनी केला. तुम्ही देशाचे माजी गृहमंत्री आहात. आमचा कार्यकर्ता गरीब आहे. त्यांना हा धंदा सोडून दुसरा धंदा जमत नाही.त्यामुळे तुम्ही एसपीना त्याबाबत बोला असे सांगत म्हेत्रे यांनी दोन नंबर धंदे सुरू करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्याकडे विनंती केली. धंदे चालू केले तर सगळे धंदे चालू करा किंवा बंद करायचे तर सगळे धंदे बंद करा. उपोषण करून, सगळ्या नेत्यांना सांगून बास झाले, त्याचा काही उपयोग नाही.

पोलीस काय बीजेपीच्या पोटाला जन्माला आलेत का?

पोलीस काय बीजेपीच्या पोटाला जन्माला आलेत का? असा सवालही म्हेत्रे यांनी विचारला. पोलिसांना भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकसारखेच असायला हवे. आता एवढंच सांगतो, खोट्या केसेस करणं, विधानसभेत बोलून आमच्या कार्यकर्त्यांचे धंदे बंद पाडता. काँग्रेस कार्यकर्त्यांचे हॉटेल बंद व्हावे म्हणून विधानसभेत बोलता का ? मग पुढे वळसंगला जावा, तिथे सर्व चालू आहे. ते का बोलत नाही तुम्ही ? असा सवाल त्यांनी विचारला.

एवंढच नव्हे तर, आता आमचं डोकं खराब झालं आहे. जे काय होईल ते होईल. एक तर तो राहील नाहीतर मी राहील , असे म्हणत काँग्रेस तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना व्यासपीठावरून थेट धमकी दिली. कोणी काही काळजी करू नका. कोणाला जो धंदा पाहिजे तो आजपासून चालू करा. काही लागलं तर माझ्याकडे या. आजपासून सर्वजण कामाला लागा, असे ते म्हणाले.

Follow Us
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती
इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
Delhi INDIA Alliance Rally : इंडिया अघाडीच्या रॅलीतून भाजप सरकारवर सडकून टीका
ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही...
Delhi INDIA Alliance Rally : ज्ञानेश कुमार यांना हटवेपर्यंत आंदोलन थांबणार नाही... राहुल गांधींचा निर्धार; रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या...
कसरच सोडली नाही, मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं; थेट बड्या नेत्यांची नावं घेत केला घणाघात
एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर घणाघात; कलम 370 वरून साधला निशाणा!
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत..
ठाण्यात भव्य पदयात्रेला जोरदार प्रतिसाद; फडणवीस-शिंदेंच्या उपस्थितीत शक्तिप्रदर्शन
राम पुरणेकरांनी घेतली CM फडणवीसांची भेट?
प्रदीप पुरणेकर प्रकरणाला नवे वळण! मुलगा राम पुरणेकरांनी घेतली फडणवीसांची भेट, नेमकं सत्य काय?
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
शेतकऱ्यांची मागणी मान्य? नीरा नदीपात्रातून 750 क्युसेक पाण्याचा विसर्ग
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेत होणार
न्यायासाठी राम पूर्णेकर थेट फडणवीसांची भेट; ठाण्यातील पदयात्रेतही होणार सहभागी!
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदेंचा सहभाग?
ठाण्यात भाजपची ‘लोकतंत्र बचाव’ पदयात्रा; उपमुख्यमंत्री शिंदे होणार सहभागी