AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases in India: देशात आजही कोरोना रुग्णसंख्येत उसळी, महाराष्ट्रातील रुग्णांचा सर्वाधिक 17.68% वाटा!

कोरोनाच्या या नव्या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही जास्त चिंताजनक बाब आहे.

Corona Cases in India: देशात आजही कोरोना रुग्णसंख्येत उसळी, महाराष्ट्रातील रुग्णांचा सर्वाधिक 17.68% वाटा!
Corona
| Updated on: Jan 12, 2022 | 11:15 AM
Share

नवी दिल्लीः भारतात आज पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येने (Corona Cases) मोठी उसळी घेतल्याचे दिसून आले. मागील 24 तासात देशात नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 1,94,720 एवढी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार, देशातील कोरोना संसर्गाचा दर 11.05 टक्के एवढा झाला असून कालच्या तुलनेत रुग्णवाढीचा दर 15.9 टक्के एवढा जास्त नोंदवला गेला. तसेच देशातील ओमिक्रॉनच्या (Omicron) एकूण रुग्णांची संख्या 4868 एवढी झाली आहे. कोरोनाच्या या नव्या विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही जास्त चिंताजनक बाब आहे.

रुग्णवाढीची टॉप 5 राज्ये कोणती?

मंगळवारी वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता टॉप 5 राज्यांमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णवाढीपैकी 54.77% नवे रुग्ण या पाच राज्यांमध्ये आढळून आले. तर फक्त महाराष्ट्रात 17.68 टक्के रुग्णवाढ दिसून आली. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ही मोठी चिंताजनक बाब आहे. टॉप पाच राज्यांतील आकडेवारी पुढीलप्रमाणे- महाराष्ट्र- 34 हजार 424 दिल्ली- 21,259 पश्चिम बंगाल- 21,098 तमिळनाडू- 15,379 कर्नाटक- 14,473

सर्वाधिक मृत्यू कुठे?

मागील 24 तासात देशात 165 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे देशातील एकूण मृतांची संख्या 4 लाख 84 हजार 378 एवढी झाली आहे. कालच्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक संख्या दिल्लीतील असून दिल्लीतील 23 रुग्णांचा काल मृत्यू झाला तर महाराष्ट्रातही 22 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. भारतातील कोरोनाचा रिकव्हरी रेट आतापर्यंत 96.01% एवढा झाला आहे. मागील 24 तासात भारतात 60,405 एवढे रुग्ण बरे झाले.

देशात आतापर्यंतची आकडेवारी

एकूण रुग्णसंख्या- 3,60,70, 510 ओमिक्रॉनचे रुग्ण- 4,868 सक्रिय रुग्णसंख्या- 9,55,319 एकूण बरे झालेले रुग्ण- 3,46,30, 536 एकूण मृत्यू- 4,84,655 एकूण लसीकरण – 1,53,80,08,200

इतर बातम्या-

सासरी विवाहितेकडे केलेली कोणतीही भौतिक मागणी हुंडाच, सुप्रीम कोर्टाचं मत, हायकोर्टाने सोडलेल्या पती-सासऱ्याला सश्रम कारावास

पंतप्रधानांच्या पंजाब दौरा प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाचा फैसला येण्याची शक्यता, काँग्रेस सरकारची अडचण होणार?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.