Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुण्याचा धोका वाढला , कोरोनाची कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर

राज्य तसेच देशातील कोरोना आणि ओमिक्रॉन संसर्गाचे लाईव्ह अपडेट्स फक्त टीव्ही 9 मराठीवर...

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : पुण्याचा धोका वाढला , कोरोनाची कुठे काय स्थिती? वाचा सविस्तर
पुणे शहरात 19 हजार 452 रुग्णसंख्या

Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहे. संसर्ग वाढू नये म्हणून राज्यात कोरोना प्रतिबंधक नियम आणखी कडक केले जात आहेत. मात्र असे असतानादेखील कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याचं दिसतंय. मुंबई, पुणे अशा मोठ्या शहरांतही रुग्ण वाढत आहेत. शाळा, महाविद्यालये सध्या बंद करण्यात आले आहेत. तसेच पर्यटणस्थळेदेखील बंद करण्यात आले आहेत. राज्य सरकारकडून नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन केले जात आहे. राज्यातील कोरोना तसेच ओमिक्रॉन संसर्गासंबंधीचे सर्व अपडेट्स आणि ब्रेकिंग न्यूज फक्त टीव्ही 9 मराठीवर…..

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 12 Jan 2022 21:19 PM (IST)

  पुण्यात आज ओमिक्रॉन रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ

  पुण्यात आज ओमिक्रॉन रुग्णांची रेकॉर्डब्रेक वाढ

  दिवसभरात वाढले 53 रुग्ण,

  राज्यात आज ओमिक्रॉनचे 86 रुग्ण,

  मुंबई 21 ,पिंपरी. चिंचवड 6 सातारा3 नाशिक 2 आणि पुणे ग्रामीण 1

  आतापर्यंत राज्यात 1367 रुग्णांची नोंद

  तर 734 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज !

 • 12 Jan 2022 21:15 PM (IST)

  पुणे जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येनं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

  पुणे जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येनं जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर,

  उद्यापासून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील दोन जम्बो कोव्हीड सेंटर होणार सुरू

  राज्याच्या आरोग्य विभागाकडून जिल्हाधिकाऱ्यांना आदेश,

  तत्काळ कर्मचारी भरती करून उद्यापासून होणार सुरू

  शिवनेरी जम्बो कोव्हीड सेंटर आणि अवसरी जम्बो कोव्हीड सेंटर ( आंबेगाव )

  जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढले आदेश,

  जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येनं प्रशासन सतर्क !

 • 12 Jan 2022 19:39 PM (IST)

  अकोल्यात आजच्या अहवालात 196 रुग्ण पॉझिटिव्ह

  अकोल्यात आजच्या अहवालात 196 रुग्ण पॉझिटिव्ह….

  आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह अहवाल 58715….

  तर आतापर्यंत 1143 जणांचा मृत्यू झाला आहे….तर…

  आज दिवसभरात 48 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे…

  तर आजपर्यंत 56837 जणांना डिस्चार्ज मिळाला असून….

  सध्या 735 रुग्ण ऍक्टिव आहेत…

 • 12 Jan 2022 19:37 PM (IST)

  पुण्याचा धोका वाढला

  दिवसभरात 4 हजार 857 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

  दिवसभरात रुग्णांना 1805 डिस्चार्ज.

 • 12 Jan 2022 18:29 PM (IST)

   कोरोनाने जळगावकरांची चिंता वाढवली

  कोरोनाने जळगावकरांची चिंता वाढवली

  एक कोरोनाबाधिताचा मृत्यु जिल्ह्यात कोरोनाचे नवे 285 रुग्ण आढळले

  जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचे झपाट्याने रूग्ण वाढत असताना दुसरीकडे आज बऱ्याच दिवसांनंतर एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्याने जिल्हावासियांची चिंता वाढली आहे.

 • 12 Jan 2022 17:08 PM (IST)

  कोल्हापूरचे सीपीआर ठरले हॉटस्पॉट

  कोल्हापूरचे सीपीआर ठरले हॉटस्पॉट

  रुग्णालयातील 37 जणांना कोरोनाची लागण

  डॉक्टरसह इतर स्टाफही पॉझिटिव्ह

  दोन डोस पूर्ण असलेल्याना कोरोनाची लागण

  कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरू

 • 12 Jan 2022 13:35 PM (IST)

  भारतीय गोलंदाजांना कमाल दाखवावी लागेल

  भारतीय गोलंदाजांना आज कमाल दाखवावी लागेल. दुसऱ्याकसोटीच्या दुसऱ्याडावात केलेल्या चूक टाळून दक्षिण आफ्रिकेला लवकर गुंडाळाव लागेल.

 • 12 Jan 2022 13:12 PM (IST)

  कोरोना संसर्गावरुन काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचा राज्य सरकारला घरचा अहेर

  चंद्रपूर : काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचा राज्य सरकारला घरचा अहेर,

  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही अपयशी,

  लोकांनी आयुष्यभर बूस्टर डोज घेत राहायचे का विचारला सवाल,

  शाळा बंद करण्याच्या निर्णयावर देखील ओढले ताशेरे,

  सर्व निर्बंध शिथिल करण्याची मागणी,

  बाळू धानोरकर यांनी कालच केली होती ताडोबा व्याघ्र प्रकल्प सुरु करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी,

  निर्बंधांबाबतचे निर्णय सर्व विषय समजून घेतले गेले पाहिजे,

  2 वर्षांच्या कालखंडात राज्य आणि केंद्र सरकारने कुठल्याच निश्चित उपाययोजना झाल्या नसल्याचं केलं वक्तव्य

 • 12 Jan 2022 12:37 PM (IST)

  बुलडाणा जिल्ह्यात आढळले तब्बल 105 कोरोना पॉझिटिव्ह

  बुलडाणा : जिल्ह्यात आज तब्बल 105 कोरोना पॉझिटिव्ह

  जिल्ह्यात आज रोजी 336 सक्रिय रुग्ण

  एकट्या बुलडाणामध्ये 50 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

 • 12 Jan 2022 08:46 AM (IST)

  पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे बंद

  पिंपरी चिंचवड-शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सर्व केंद्रे आज बंद

  -लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्रे आज बंद राहणार

 • 12 Jan 2022 08:32 AM (IST)

  भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव, कर्मचार्‍यांसह काही पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

  नवी दिल्ली : भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयात कोरोनाचा शिरकाव

  अनेक कर्मचार्‍यांसह काही पदाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह

  गेल्या दोन दिवसांपासून भाजप कार्यालयात बैठकांचे सत्र

  योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेत्यांची कार्यालयात होती उपस्थिती

  आजही भाजप कार्यालयात बैठकांचे सत्र होणार

 • 12 Jan 2022 08:05 AM (IST)

  अकोला शहरासह जिल्हाभरात कोरोनाचे थैमान, 199 कोरोना रुग्णांची नोंद 

  अकोला- अकोला शहरासह जिल्हा भरात कोरोनाचे थैमान

  – गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 199 कोरोना रुग्णांची नोंद

  – दिवसभरात 25 जणांनी कोरोनावर मात केली आहे

  – आतापर्यंत 1143 जणांचा मृत्यू झाला आहे

  – सध्या 587 रुग्ण उपचार घेत आहेत

  – कोरोनाबाधितांचा आलेख वाढत असल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

  – आरोग्य विभाग पुन्हा हायअलर्टवर

 • 12 Jan 2022 07:47 AM (IST)

  नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे थैमान, 1450 कोरोना रुग्णांची नोंद

  – नाशिक शहरासह जिल्हाभरात कोरोनाच थैमान

  – गेल्या 24 तासात जिल्ह्यात तब्बल 1450 कोरोना रुग्णांची नोंद

  – यात सर्वाधिक 1 हजार 38 रुग्ण आढळले नाशिक शहरात

  – कोरोनाबाधितांचा आलेख वाढता असल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

  – आरोग्य विभाग पुन्हा हाय अलर्टवर

 • 12 Jan 2022 06:40 AM (IST)

  पाच महिन्यानंतर नागपुरात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद, 799 नव्या रुग्णांची नोंद

  नागपूर – पाच महिन्यानंतर नागपुरात कोरोना मृत्यूची नोंद

  – 46 वर्षाय व्यक्तीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू, मृत्यूनंतर अहवाल पॅाझिटीव्ह

  – नागपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 799 पॅाझिटीव्ह रुग्ण

  – सक्रिय रुग्णसंख्या 4724 वर पोहोचली

  – नागपूरातील पॅाझिटीव्हीटी दर 6.9 टक्क्यांवर

 • 12 Jan 2022 06:30 AM (IST)

  वर्धा जिल्ह्याचे खासदार रामदास तडस यांना कोरोनाची लागण

  वर्धा – वर्धेचे खासदार रामदास तडस यांना कोरोनाची लागण

  – दिल्ली येथे कोरोनाची लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती

  – प्रकृती स्वस्थ असून डॉक्टरांच्या सल्याने दिल्ली येथील निवासस्थानी विलगीकरणात असल्याची माहिती

  – खासदार तडस यांनी ट्वीटर आणि फेसबुकच्या माध्यमातून दिली माहिती

Published On - 6:25 am, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI