Aurangabad Corona : सकाळी 30 रुग्ण वाढले, दुपारी 28, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 900 पार

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Corona Patient increase Aurangabad) आहे.

Aurangabad Corona : सकाळी 30 रुग्ण वाढले, दुपारी 28, औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 900 पार
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 6:24 PM

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत (Corona Patient increase Aurangabad) आहे. मुंबई, पुणे या मोठ्या शहरानंतर आता औरंगाबादमध्येही कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. औरंगाबाद शहरात आज (16 मे) सकाळी तब्बल 30 जणांना तर दुपारनंतर 28 जणांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा हा 900 वर पोहोचला (Corona Patient increase Aurangabad) आहे.

त्याशिवाय औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा 25 वर जाऊन पोहोचला आहे. दुसरीकडे अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे औरंगाबाद शहरातील संजय नगर परिसरातील कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा आकडा हा तब्बल 106 वर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे हा परिसर औरंगाबाद शहरातील अतिसंवेदनशील परिसर बनला आहे.

कोरोनाचा वाढता आकडा नियंत्रणात ठेवण्यासाठी औरंगाबाद शहरात सध्या पॅरामिल्ट्री फोर्स तैनात करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनसह शहराच्या इतरही परिसरात हे जवान तैनात असणार आहेत. तर दुसरीकडे कंटेन्मेंट झोनमध्ये सुरू असलेली नागरिकांची वर्दळ कमी करण्यासाठी आता कंटेन्मेंट झोन परिसरात गस्ती पथक सुरू करण्यात आले आहेत. हे पथक दिवसातून दोन वेळा रेड झोन मध्ये गस्त घालणार आहे.

औरंगाबदमध्ये आज सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण हे एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1) अन्य (7) या भागातील आहेत. यामध्ये 17 पुरुष आणि 13 महिला रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 29 हजार 100 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1068 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 6564 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

संबंधित बातम्या : 

India Corona Update | कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत चीनच्या पुढे, आकडा 85 हजारांच्या पार

मालेगावात एकाच दिवसात 51 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत एकूण 428 रुग्णांना डिस्चार्ज

कोरोनामुळे आणखी दोन पोलिसांचा मृत्यू, एका दिवसात 79 पोलिसांना कोरोना, बाधितांची संख्या 1140 वर

Non Stop LIVE Update
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.