मालेगावात एकाच दिवसात 51 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत एकूण 428 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली (Corona Patient recover in Malegaon) आहे.

मालेगावात एकाच दिवसात 51 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत एकूण 428 रुग्णांना डिस्चार्ज
Follow us
| Updated on: May 16, 2020 | 2:00 PM

मालेगाव : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली (Corona Patient recover in Malegaon) आहे. पण याच दरम्यान मालेगावातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगावात एकाच दिवसात तब्बल 51 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत एकूण 428 रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण बरे झाल्याने नागरिकांनाही दिलासा मिळाला (Corona Patient recover in Malegaon) आहे.

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावातून एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनामुक्त होत असल्याने आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाला मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासोबत मालेगावातील 93 अहवाल आले असून यातील 90 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर 3 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. मालेगावात आतापर्यंत एकूण 605 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत एकूण 33 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नाशिकमधील येवल्यातही आता कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे समोर आले आहे. येवल्यात गेल्या दोन दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट दिसत आहे.

नाशिक शहरात आज दिवसभरात तीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर कुंभारवाडा, सिद्धेश्वर नगर, गोसाविवाडी परिसर 14 दिवसांसाठी सील करण्यात आले आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत 700 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत 29 हजार 100 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 68 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 6 हजार 564 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त झालेले आहेत.

संबंधित बातम्या : 

Corona : पुणे 141, कोल्हापूर 7, औरंगाबाद 30, एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ

Maharashtra Corona Update | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 29 हजारांवर, मुंबईत 17,671 रुग्ण

Non Stop LIVE Update
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....