उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला दानशूरांचा भरभरुन प्रतिसाद, मुख्यमंत्री सहायता निधीत 197 कोटी जमा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या 24 दिवसांत 197 कोटी रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात जमा झाले आहेत.

उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला दानशूरांचा भरभरुन प्रतिसाद, मुख्यमंत्री सहायता निधीत 197 कोटी जमा
Follow us
| Updated on: Apr 12, 2020 | 8:10 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाचा सामना (CM Relief Fund) करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या स्वतंत्र बँक खात्यात दानशूर व्यक्ती आणि संस्थानी आपले योगदान द्यावे, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या 24 दिवसांत 197 कोटी रुपये या खात्यात जमा झाले आहेत. या सर्वांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत (CM Relief Fund).

मुख्यमंत्री साहाय्यता निधीत आतापर्यंत 83 वेगवेगळ्या दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी प्रत्येकी 25 लाखांपेक्षा जास्त रकमेची मदत केली आहे. तर गेल्या दोन दिवसात ग्राफाईट इंडिया, ज्योती लॅब्स, नवीन फ्लूराईन इंटरनॅशनल, जगन्नाथ शेट्टी फाउंडेशन, ब्लू क्रॉस लेबर यांनी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी जमा केला आहे.

याशिवाय चिमुकल्यांसह कित्येक व्यक्ती, संस्था, संघटना, उद्योजक, व्यावसायिक आदींनीही आपापल्यापरिने हातभार लावला आहे. त्यामुळेच निधीत आतापर्यंत 197 कोटी रुपये जमा झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या सर्व दानशूरांचे आभार मानले आहेत.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी

कोविड 19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे.

सढळ हाताने मदत करा

उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले (Corona Virus CM Relief Fund) आहे.

20 मार्चपासून आतापर्यंत सीएसआर निधीतून (Corona Virus CM Relief Fund) तसेच देणगी स्वरुपात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाकडे अनेक उद्योग आणि संस्थानी मदत देणे सुरु केले आहे.

इंडियन ह्यूम पाईप, रायचंद ट्रस्ट, वालचंद ट्रस्ट, इंडियन ऑइल, आयसीआयसीआय, बादल मित्तल ग्रुप, फ़ार्म इझी, महानगर गॅस, सिप्ला फॉउंडेशन, गोदरेज ग्रुप, जेएम फायनांशियल, मराठा चेंबर ऑफ़ कॉमर्स, सत्व कंसल्टिंग, पल्लवी चोक्सी, एम्एसईडीसीएल, इंडियन मर्चेंट्स चेंबर, बलदेव अरोरा ट्रस्ट, एशियन पेंट्स, हायकेल इंडिया या संस्थानी जवळपास 10 कोटींची उपकरण आणि वैद्यकीय साहित्य दिलं आहे. यात मास्कस, व्हेन्टीलेटर, पीपीई किट्स, आरटी- पीसीआर मशीन, मल्टी लोडर रेडिओग्राफी सिस्टिम, मोटराइज्ड बेड्स, फ्रीजर यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.