मुंबईकरांना झालंय काय? गेटवे ऑफ इंडियावर हौशींची प्रचंड गर्दी; कोरोना नियमांचे तीन तेरा!

मुंबईत कोरोनाचं संकट वाढलेलं असताना मुंबईकर मात्र बेफिकीर असल्याचं दिसत आहे. (Coronavirus: hundreds gather in gateway of india defiance of 'social distancing' rules)

मुंबईकरांना झालंय काय? गेटवे ऑफ इंडियावर हौशींची प्रचंड गर्दी; कोरोना नियमांचे तीन तेरा!
Follow us
| Updated on: Feb 21, 2021 | 4:25 PM

मुंबई: मुंबईत कोरोनाचं संकट वाढलेलं असताना मुंबईकर मात्र बेफिकीर असल्याचं दिसत आहे. कोरोनामुळे मुंबईकरांना खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून वारंवार दिलेल्या असतानाही मुंबईकर मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडताना दिसत आहेत. आज तर गेट वे ऑफ इंडिया परिसरात मुंबईकरांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे मुंबईकरांच्या या बेफिकीरीवर चिंता व्यक्त केली जात आहे. (Coronavirus: hundreds gather in gateway of india defiance of ‘social distancing’ rules)

मुंबईत कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी मुंबईकर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. पालिकेकडून वारंवार गर्दी न करण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असूनही मुंबईकर गेटवे ऑफ इंडिया परिसरात गर्दी करत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. गेटवे परिसरातही अशीच गर्दी पाहायला मिळतेय. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. आज रविवारचा सुट्टीचा दिवस असल्याने हौशी मुंबईकर फिरण्यासाठी गेटवेवर आल्याचं पाह्यला मिळत होतं. अनेकजण कुटुंबासह गेटवेवर आले होते. त्यामुळे मुंबईकरांना कोरोनाची भीती वाटत नाही की काय? असंच वाटत होतं.

मास्क शिवाय गेटवेवर

कोरोना विषाणूच्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनानं काही महत्त्वाच्या नियमांची आखणी करुन देत त्याचं सक्तीनं पालन करावं असे निर्देशही दिले आहेत. पण, अनेकदा मायानगरी मुंबईमध्ये मात्र या प्रतिबंधात्म उपाययोजना आणि नियमांचं पालनक करण्यात येत नसल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेटवेवर तर मास्क शिवाय लोक फिरताना दिसत आहेत. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कोरोनाच्या गडद छायेखाली असताना तरी किमान शहरातील नागरिक मास्कचा वापर करणं, सोशल डिस्टन्सिंग पालन या साऱ्या नियमांचं गांभीर्यानं पालन करतात का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालिकेचा अॅक्शन प्लान

मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्या काही दिवसांपूर्वी कमी झाली होती. पण आता पुन्हा एकदा ही संख्या वाढायला लागली आहे. ज्याप्रकारे मुंबई महापालिकेने वर्षभर कोरोना विरोधात लढण्यासाठी नियोजन केलं होतं पुन्हा एकदा तसाच अॅक्शन प्लान मुंबई महापालिकेने तयार केलेला आहे. मुंबईत रुग्णसेवा कुठेही कमी पडू नयेत यासाठी मुंबई महापालिका नियोजन करत आहे. पालिकेचे तयार केलेले बंद करणार कोविड सेंटर अजून सुरूच आहेत. तसेच पालिकेच्या रुग्णालयात सुद्धा कोविड बेड उपलब्ध करून ठेवण्यात आलेत. सध्या मुंबईत 8 हजार 799 बेड शिल्लक आहेत. मुंबईत कोरोनाचे रुग्ण संख्या आता वाढू लागली आहे. त्यामुळे कमी झालेले कंटेनमेंट झोन आणि सीलबंद इमारती यांची संख्या सुद्धा पुन्हा एकदा वाढू लागली आहे. सध्या मुंबईत 1305 सीलबंद इमारती आहेत. कंटेनमेंट झोन आणि सीलबंद इमारतींचा विचार केला तर झोपडपट्ट्यांपेक्षा गगनचुंबी बिल्डींगमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. (Coronavirus: hundreds gather in gateway of india defiance of ‘social distancing’ rules)

मुंबई महापालिका बेडचं नियोजन

1) एकूण बेड – 11,968

रुग्णाना दिलेले बेड – 3169

शिल्लक बेड – 8799

2) DCH & DCHC बेड – 11205

रुग्णांना दिलेले बेड – 3082

शिल्लक बेड – 8123

3) ICU बेड – 1528

रुग्णाना दिलेले बेड – 553

शिल्लक बेड – 975

4) ऑक्सिजन बेड – 6174

रुग्णांना दिलेले बेड – 1359

शिल्लक बेड – 4815

5) व्हेंटिलेटर बेड – 959

रुग्णाना दिलेले बेड – 363

शिल्लक बेड – 596

6) मुंबई एकूण रुग्ण संख्या – 318207

अॅक्टिव्ह रुग्ण – 6900

डिस्चार्ज रुग्ण – 299006

मृत्यू संख्या – 11438

7) आता पर्यंत कोरोना चाचण्या 3117294

मुंबईत बरे झालेल्या रुग्णाचा दर – 94 टक्के

मुंबईत कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा दर 371 दिवस

सक्रिय कंटेनमेंट झोन 93

सील बंद इमारती 1305 (Coronavirus: hundreds gather in gateway of india defiance of ‘social distancing’ rules)

संबंधित बातम्या:

पुण्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, अजित पवारांनी अधिकाऱ्यांना बजावलं, म्हणाले, ‘या सूचनांचं पालन झालंच पाहिजे!’

लॉकडाऊन, संचारबंदी, नवे हॉटस्पॉट, नवे निर्बंध, विदर्भात कोणत्या जिल्ह्यात काय?; वाचा स्पेशल रिपोर्ट

कोरोनाचे सुपर स्प्रेडर ते सारीच्या रुग्णांचाही शोध घेणार; वाचा, पुणे पालिकेचा डिटेल अ‍ॅक्शन प्लान

(Coronavirus: hundreds gather in gateway of india defiance of ‘social distancing’ rules)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.