AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माफीच्या साक्षीदारामुळे खटल्याचा विचका? कोर्टाचे कडक ताशेरे, गंभीर निरीक्षणं… काय काय घडलं कोर्टात?

खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील आणि नेते पवनराजे निंबाळकर प्रकरणात कोर्टाने अखेर निकाल दिला. सर्व आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. पुराव्याच्या अभावी आरोपींची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. कोर्टाने सर्व निकालाचे वाचन केले.

माफीच्या साक्षीदारामुळे खटल्याचा विचका? कोर्टाचे कडक ताशेरे, गंभीर निरीक्षणं... काय काय घडलं कोर्टात?
Pawanraje Nimbalkar
| Updated on: Jun 20, 2026 | 1:21 PM
Share

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या खटल्यावर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. कोर्टाने निकाले वाचन केले. या निकालाचं वाचन करताना कोर्टाने काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. यावेळी कोर्टाने सीबीआय, पोलिसांच्या तपासावर ताशेरे तर ओढले आहेत. पण माफीच्या साक्षीदारावरच बोट ठेवलं. माफीच्या साक्षीदाराकडून दिलेल्या साक्षीवरच गंभीर प्रश्न निर्माण करत कोर्टाने कडक ताशेरे ओढले आहे. आरोपी, चालक आणि माफीच्या साक्षीदाराच्या साक्षी जुळत नाहीत, चालक आणि माफीचा साक्षीदार नागपूरला एकत्र गेले, त्याची साक्षही एकत्र जुळत नाही. त्यामुळे माफीचा साक्षीदार हा विश्वासू राहिलेलाच नाही, अशी गंभीर टिप्पणी कोर्टाने नोंदवली आहे. माफीच्या साक्षीदाराने वारंवार साक्ष बदलल्यामुळेच या खटल्याचा विचका झाल्याचं कोर्टाच्या निरीक्षणातून दिसून आलं आहे.

आतापर्यंतचा निकालाचा रोख हा पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात ठोस पुरावे असल्याचा नाही. आरोपींची गाडी जी जप्त केली होती ती जप्त करताना जळून खाक झाली होती. तिचा रंग दिसत न्हवता पण पंचनामा यादीत गाडीचा रंग हिरवा असे नमूद करण्यात आले आहे. गाडीचा रंग कळला कसा ? – कोर्ट गाडी किती रुपयांना घेतली. तिघांच्या माहितीत तफावत. तीन वेळा माफीच्या साक्षीदाराने वेगळी साक्ष दिली.

दोघेही गाडीने लातूरला गेले, तिथून शिर्डीला गेले. माफीचा साक्षीदार आणि पिंटू सिंग कुठे कुठे गेले हे जुळत नाही साक्षीदार आणि चालकाच्या साक्षीत तफावत. माफीच्या साक्षीदाराला खोटं बोलण्याची सवय. तो सोयी नुसार साक्ष बदलतो. आरोपींचे संभाषण ज्या पिसियूवरून (फोनवरून) झाले त्याचाही सीडीआर कोर्टात सिध्द झालेला नाही – कोर्ट

महत्वाचा असा मानला जाणारा सीडीआरचा पुरावाही कोर्टासमोर सिध्द झालेला नाही – कोर्ट. फोन संभाषणाचे पुरावे कोर्टासमोर नाहीत. घटना घडली त्याचा तपशील माफीच्या साक्षीदाराने विस्तृत सांगितले आहे. पवनराजे निंबाळकर हे ज्या गाडीतून जात होते त्यांच्या मागून आरोपींनी पाठलाग केला. पवनराजे यांच्या ड्रायव्हरला आरोपींनी गाडी बाजूला घेऊन थांबण्यास सांगितलं.

गाडी थांबल्यानंतर आरोपींनी ड्रायव्हरला राजे साहेब कुठे आहेत असे विचारले आणि मागच्या सीटवर बसलेल्या पवनराजे निंबाळकर यांची काच खाली घेतल्यावर गोळ्या झाडल्या आणि पळून गेले. असा घटनाक्रम माफीच्या साक्षीदाराने सांगितला आहे. घटना कशी घडली याच रिक्रियेशन करण्यात आलेल नाही – कोर्ट फक्त ऐकीव माहितीवर कोर्ट विसंबून न राहता तथ्ये तपासण्यावर विश्वास ठेवते.

आधी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गोळ्या झाडल्या अशी नोंद करण्यात आली होती. मात्र नंतर कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या अशी करण्यात आलीय. एक अज्ञात दुचाकी पंजाब पासिंगची पोलिसांना कळंबोली परिसरात आढळून आलेली होती मात्र त्या वाहनाचा आणि या गुन्ह्याचा काही सबंध आहे का हे पोलिसानी तपासले नाही

सापडलेल्या दुचाकी गाडीचा तपास झाला नाही. आरोपी हत्येच्या नंतर मुंबईतून कसा बाहेर पडला त्याच्या तपशिलातही गोंधळ आहे. आरोपीने लग्न अटेंड केल, दारू प्यायला त्यानंतर अहमदाबादला गेला असाही तपशील आहे. आरोपीचा हा जबाब एका कथानकाप्रमाणे बसवण्यात आल्यच वाटतय. सरकारी पक्षाला सोयीस्कर वाटेल तसा जबाब घेण्यात आला आरोपीच्या हॉटेलचे चेक इन चेक आउटच्या वेळातही तफावत.

Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त