AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईलच असे नाही: राजेश टोपे

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली आहे. याचा अर्थ लाट येईलच असे नाही, अशी सारवासारव करतानाच ही लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. (COVID-19 second wave unlikely: Rajesh Tope)

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येईलच असे नाही: राजेश टोपे
| Updated on: Nov 12, 2020 | 2:39 PM
Share

औरंगाबाद: राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली आहे. याचा अर्थ लाट येईलच असे नाही, अशी सारवासारव करतानाच ही लाट येऊ नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. (COVID-19 second wave unlikely: Rajesh Tope)

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे, असं विधान राजेश टोपे यांनी केल्याच्या बातम्या सर्वच माध्यमांमध्ये झळकल्या होत्या. त्यावर प्रतिक्रिया देताना राजेश टोपे यांनी ही सारवासारव केली. राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता मी व्यक्त केली होती. ती येईलच असे नाही. पण लाट आली तरी प्रशासन सज्ज आहे. दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहेत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

यावेळी त्यांनी कोरोना लसीबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. कोरोना लसीबाबतची पूर्ण तयारी झाली आहे. फ्रंटलाइन वर्कर्सची यादी तयार झाली आहे. कोल्ड स्टोरेज व्यवस्था पूर्ण होत आली आहे. त्यामुळे लसीकरणासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहे, असंही ते म्हणाले. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत लस आलीच पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्राला लस कधी उपलब्ध होणार याबाबत आम्ही देशाच्या आरोग्यमंत्र्यांकडून माहिती मागवली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, टोपे यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून दिवाळीत फटाके न वाजवण्याचं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे. डेथ ऑडिट कमिटी आणि टास्क फोर्सशी बोलणं झालं. त्यांनीही थंडीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास मज्जाव करण्याचा सल्ला दिला आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीतही हा विषय चर्चेसाठी आला होता. त्यातही मुख्यमंत्र्यांपासून सर्वांचं फटाके विरहित दिवाळी साजरी केली जावी असं म्हणणं पडलं. त्यामुळे राज्यातील जनतेने यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी, असं आवाहन राज्य सरकारच्यावतीने करण्यात येत असल्याचं टोपे यांनी सांगितलं होतं. फटाक्यांमुळे कुणालाही श्वसनाचा त्रास उद्भवणार नाही, याची जबाबदारी आपलीच असल्याचंही ते म्हणाले होते.

संबंधित बातम्या:

Rajesh Tope | फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा, आरोग्यमंत्री राजेश टोपे

Rajesh Tope | राज्यात यंदा फटाक्यावर बंदी येणार? आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती

(COVID-19 second wave unlikely: Rajesh Tope)

Follow Us
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम.
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती.
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?
रुपाली ठोंबरे यांचा रुपाली चाकणकरांना सूचक इशारा; आणखी काय म्हणाल्या?.
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही.....
देशात इंधनाचा तुटवडा नाही, युद्धजन्य परिस्थितीचाही परिणाम नाही......
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?
खरातच्या मुलीला फ्लॅट भेट, चौकशीसाठी चाकणकरांना का बोलावले नाही?.
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके...
अस्मानी संकटाचा कहर... शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू अन् हुंदके....
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.