Metro Tax | मेट्रो अधिभाराच्या धास्तीने नागरिकांची नोंदणी कार्यालयात गर्दी ; मात्र दस्तनोंदणी कार्यालयात सर्व्हरला येतेय अशी अडचण

Metro Tax  | मेट्रो अधिभाराच्या धास्तीने नागरिकांची नोंदणी कार्यालयात गर्दी ; मात्र दस्तनोंदणी कार्यालयात सर्व्हरला येतेय अशी अडचण
पुणे मेट्रो, संग्रहित छायाचित्र
Image Credit source: Tv9

1 एप्रिलपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र तसेच, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्कात 1 एप्रिल 2020 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी मेट्रो अधिभारावर सवलत देण्यात आली होती. ही मुदत 31 मार्चला संपुष्टात येत आहे.

प्राजक्ता ढेकळे

|

Mar 26, 2022 | 5:35 PM

पिंपरी- येत्या 1 एप्रिलपासून   एक टक्का मेट्रो अधिभारचा भुर्दंड (Metro Tax) सहन करावा लागणार आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडसाठी येत्या 1 एप्रिलपासून मालमत्ता खरेदी-विक्री करताना एक टक्का मेट्रो कर द्यावा लागेल. त्यासंदर्भातील स्वतंत्र आदेश नुकतेच नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाने (Registration Stamp Duty Department)काढले. ज्या शहरात मेट्रो प्रकल्पाची (Metro)  अंमलबजावणी होत आहे. यामुळे शहरातील सह-दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीसाठी गर्दी झाली आहे. तथापि, कार्यालयांमध्ये गेल्या 15 दिवसांपासून सर्व्हर डाऊनचा अनुभव येत आहे. पर्यायाने, कामकाज संथ गतीने सुरू आहे.

या शहरात लागू होणार मेट्रो सेस

राज्य शासनाने स्टॅम्प ड्युटीवर एक टक्का मेट्रो अधिभार लागू करण्याचा निर्णय चार वर्षांपूर्वी घेतला होता. यामध्ये मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये अंमलबजावणीस प्रारंभ झाला. परंतु 2020 मध्ये राज्य सरकारने या अधिभार वसुलीस 31 मार्च 2022 पर्यंत स्थगिती दिली होती. मात्र येत्या 1 एप्रिलपासून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र तसेच, पुणे, पिंपरी-चिंचवड व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील दस्त नोंदणीवरील मुद्रांक शुल्कात 1 एप्रिल 2020 पासून दोन वर्षांच्या कालावधीसाठी मेट्रो अधिभारावर सवलत देण्यात आली होती. ही मुदत 31 मार्चला संपुष्टात येत आहे. त्यामुळे 1 एप्रिलपासून मेट्रो अधिभार आकारला जाणार आहे.

नागरिकांची धावपळ

मार्च महिना संपण्यास केवळ सात दिवसाचं शिल्लक आहेत. त्यामुळेनागरिकांची दस्त नोंदणी कार्यालयात धावपळ सुरु झाली आहे. शहरातील सह-दुय्यम निबंधक कार्यालयांत नागरिक, वकील, पक्षकार यांनी गर्दी असलेली पाहायला मिळत आहे. दस्त नोंदणीचे काम सकाळी ७ पासून रात्री 8:30  पर्यंत सुरु आहे. दररोज साधारण 40 ते 50 च्या दरम्यान दस्ताची नोंदणी केली जात आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत असल्याचे समोर आले आहे.

Farhan Akhtar ने आयोजित केली ग्रॅण्ड पार्टी, मिस्टर ॲण्ड मिसेस कौशिक पोहोचले स्टायलिश अंदाजात, पाहा फोटो

मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्यानं छळवणूक केली, फोन टॅपिंग केलं ईडी मागं लावली: एकनाथ खडसे

फोटो काढला स्मृती इराणी यांनी आणि क्रेडीट घेतलं दुसऱ्यानं, स्मृती इराणी म्हणाल्या…

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें