AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Arnab : एल निनोनंतर आता देशावर सर्वात मोठं संकट, IMD चा थेट रेड अलर्ट; पुढचे 36 तास अत्यंत धोक्याचे

मोठी बातमी समोर येत आहे, ऐल निनोनंतर आता देशावर एक मोठं संकट घोंघावत आहे. हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुढील 36 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत.

Cyclone Arnab : एल निनोनंतर आता देशावर सर्वात मोठं संकट, IMD चा थेट रेड अलर्ट; पुढचे 36 तास अत्यंत धोक्याचे
Cyclone ArnabImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 6:48 PM
Share

यंदा देशभरात एल निनोचं सावट आहे. एल निनोचा महाराष्ट्रालाही मोठा फटका बसला आहे. जुनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलै मध्ये राज्यात मुसळधार पाऊस झाला. परंतु ऑगस्ट महिन्यात पावसात जो खंड पडला आहे, तो अजूनही राज्यात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये. राज्यात दुष्काळ पडला आहे. खरीप पिके हातची गेली आहेत. एकीकडे हे सर्व सुरू असतानाच आता दुसरीकडे देशावर एक मोठं संकट घोंघावत आहे. ते म्हणजे बंगालच्या उपसागरात एक हवामान प्रणाली तयार झाली आहे. ही हवामान प्रणाली प्रचंड वेगाने पश्चिम-उत्तर दिशेकडे सरकत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या हवामान प्रणालीचं रुपांतर पुढील 12 तासांमध्य प्रचंड दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास बंगालच्या उपसागरात ही हवामान प्रणाली तयार झाली आहे.

या वादळाचा वेग आता वाढला असून, प्रति तास 18 किलोमीटर वेगाने हे वारं पश्चिम दिशेकडे सरकत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही हवामान प्रणाली सध्या गोपालपूरपासून 200 किलोमीटर, आंध्रप्रदेशच्या कलिंगपट्टनमपासून 200 किलोमीटर पुरीपासून 210 किलोमीटर अंतरावर आहे. पुढील 12 तासांमध्ये ही हवामान प्रणाली रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. गुरुवारी हे वादळ विशाखापट्टनम आणि गोपालपूरदरम्यान उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाचा समुद्र किनारा पार करण्याची शक्यता आहे.

या काळात पुढील 24 तासांमध्ये श्रीकाकुलम, विजयनगरम,पार्वतीपुरम आणि अल्लूरी सीताराम राजू या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या हवामान प्रणालीचं रूपांत मोठ्या चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचं नामकरण ‘अर्णब’ असं ठेवलं जाणार आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून आंध्र प्रदेश आणि ओडिशाला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक भागांमध्ये या काळात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  या हवामान प्रणालीचं रूपांतर जर चक्रीवादळात झालं तर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?
आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; रोहित पवारांचा एल्गार
Rohit Pawar : आंदोलनाची परवानगी नाकारली तर...; आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर रोहित पवारांचा एल्गार
बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूर....
Yashomati Thakur : बावनकुळे, जिभेवर लगाम घाला...बावनकुळेंच्या टीकेला यशोमती ठाकूरांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाल्या...
कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
Thane | कुठे जायचं? सांगा अन् भाडं आधीच ठरेल; नेमकं कसं? व्हिडिओ बघाच
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
अंतिम सामन्यात भारताचा जलवा! श्रीलंकेवर 147 धावांनी ऐतिहासिक विजय
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल
कोल्हापुरात पावसाअभावी काढणीला आलेली पिके धोक्यात, शेतकरी हवालदिल