विनायक राऊत यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, मोठी खळबळ, थेट म्हटले, ते कधी घरी..

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News : शिवसेनेचे नेते विनायक राऊत मोठ्या अडचणीत सापडले आहेत. विनायक राऊत यांचा मुलगा गितेश याची पत्नी गिरीजा राऊत हिने खळबळ उडवून देणारे आरोप केले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्याकडून एक पत्रकार परिषद देखील घेण्यात आली.

विनायक राऊत यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप, मोठी खळबळ, थेट म्हटले, ते कधी घरी..
MP Vinayak Raut and Girija Raut
| Updated on: Jul 12, 2026 | 12:05 PM

Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News : शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांच्या सूनेने अख्ख्या कुटुंबावर गंबीर आरोप करत पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणात तब्बल 7 जणांवर गुन्हा दाखल केला. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. सूनेने गुन्हा दाखल केल्यानंतर विनायक राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. सर्व गोष्टींवर बोलताना विनायक राऊत दिसले. इतके दिवस गिरीजा का शांत बसली असाही सवाल यादरम्यान त्यांनी उपस्थित केला. गिरीजा राऊत यांनी नुकताच पत्रकार परिषद घेत सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली. त्यांच्या वकिलांनी माजी खासदार विनायक राऊत यांनाही अटक करण्याची मागणी केली. यादरम्यान पत्रकार परिषदेमध्ये गिरीजा राऊत काही मोठे खुलासे करताना दिसल्या. ज्याने विविध चर्चा रंगत आहेत. राऊत कुटुंबातील वाद आता थेट पुढे आला. त्यामध्येच पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला.

यादरम्यान गिरीजा राऊत यांनी म्हटले की, मला मेंटल ट्रॉमा केला जात होता. नवरा मारहाण करायचा. दोन कोटी रुपये खर्च करून वडिलांनी निवडणूक लढवली. त्यांची इमेज खराब होऊ नये, अशी धमकी नवरा देत होता. सात वर्षात त्यांनी ट्रॉमा दिला आहे. विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात.

आम्ही झोपडपट्टीत राहतो. लग्नात आम्हाला कधीही सांगितलं नव्हतं दुसरं घर झोपडपट्टीत आहे. विनायक राऊत हे नवरात्रीत घट बसतो तेव्हा आणि घट उठतात तेव्हा या दोन दिवशीच घरी यायचे. इतरवेळी ते कधी घरी आले नाही. फोनवरून ते जबाबदारी घ्यायला सांगायचे. मुलगा आणि बायकोला कधी बोलले नाही. तसेच ते कधी समोर आले नाही. कुटुंबप्रमुख म्हणून दोघांना त्यांना सांगायला हवं होतं, ते त्यांनी केलं नाही.

एका ठिकाणी अघोरी कृत्यावेळी विनायक राऊत होते. आम्ही सिंधुदुर्गात अघोरी पूजेला गेलो. विनायक राऊत यांनी सांगितलं तिथे आम्ही गेलो. गिरीजा राऊत यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले. मात्र, यावर सर्वकाही खोटे असल्याचे आणि गिरीजाकडून पैशांची मागणी होत असल्याचा गंभीर आरोप विनायक राऊत यांनी केला.

Follow Us