AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूनेच्या हादरवणाऱ्या आरोपांवर विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हटले ती आमच्यासोबत..

ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते विनायक राऊत यांचे कुटुंबिय अडचणीत आले. विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिने गंभीर आरोप केले. ज्याने एकच खळबळ उडाली. यादरम्यान विनायक राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

सूनेच्या हादरवणाऱ्या आरोपांवर विनायक राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, थेट म्हटले ती आमच्यासोबत..
Vinayak Raut Daughter in law Girija Raut
| Updated on: Jul 12, 2026 | 11:42 AM
Share

ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांची सून गिरीजा राऊत हिने पोलिस ठाण्यात जात विनायक राऊत, गितेश राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आणि तक्रार केली. आपल्यासोबत कसा कसा छळ झाला हे तिने तक्रारीत सांगितले. गिरीजा राऊत हिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तब्बल 7 जणांवर गुन्हा दाखल केला. शारिरिक संबंधास पती गितेश याच्याकडून नकार दिला जात असल्याचाही आरोप गिरीजा राऊतने केला. या प्रकरणावर अखेर माजी खासदार विनायक राऊत यांनी भाष्य केले. नक्की काय घडले हे त्यांनी सांगितले. विनायक राऊत यांनी म्हटले की, कुटुंबीयावरील आरोप निखालस खोटे आहे. गितेश यांचे लग्न झाल्यावर त्यांच्या पत्नी तीन वर्षाासून सोबत राहत नाही. 2018 ते 2022 पर्यंत अघोरी कृत्य केलं जात होते असं त्यांनी म्हटलंय. आईवडिलांना बाबा बुवाकडे घेऊन जाताना यायचे, असं ती म्हणते. आईबाबा सोबत होते.

असे प्रकार होते तर तेव्हाच तक्रार का केली नाही. आज 2026 मध्ये ते तक्रार करतात. त्यातूनच दिसून येतंय की यामागे काळंबेरं आहे. हे प्रकार होताना आईवडील सोबत असायचे गिरीजाने म्हटलं आहे. आई वडिलांच्या संरक्षणात असताना अघोरी प्रकारावर तक्रार का केली नाही. त्यांनी डिव्होर्सची याचिका गेल्या महिन्यात केली आहे. त्यात तडजोड करावी यासाठी दोन्ही वकिलांची बैठक झाली.

थ्री बीचएचके फ्लॅट, टेरेस फ्लॅट, पाच कोटी मागितली. इलेक्ट्रिक कार मागितली. पुन्हा डीव्होर्सची नोटीस दिली. कौटुंबीक हिंसाचाराचा उल्लेख आहे, असे विनायक राऊत यांनी म्हटले. विनायक राऊत यांनी स्पष्ट शब्दात म्हटले की, सर्व आरोप खोटे आहेत. विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत माध्यमांसमोर आले.

पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. विनायक राऊत यांना यासर्व गोष्टींची कल्पना होती, असेही गिरीजा राऊतने म्हटले. विनायक राऊत यांच्या कुटुंबासोबतच दोन बाबांवर गुन्हे दाखल करण्यात आली. विनायक राऊतांच्या सूनेने केलेल्या आरोपांनंतर मोठी खळबळ उडाली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा