AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने शोककळा, बुऱ्हानगर सरपंच ते राज्यमंत्री, जाणून घ्या प्रवास

MLA Shivajirao Kardiye passed away : आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने एकच शोककळा पसरली आहे. राज्यातील नेत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने शोककळा, बुऱ्हानगर सरपंच ते राज्यमंत्री, जाणून घ्या प्रवास
Shivajirao Kardile
| Updated on: Oct 17, 2025 | 11:03 AM
Share

ज्येष्ठ नेते आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाची बातमी कळताच त्यांच्या मतदार संघात शोककळा पसरली. राज्यातील अनेक नेत्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदार शिवाजीराव कर्डीले यांना श्रद्धांजली वाहिली. आमदार कर्डीले यांच्या निधनामुळे जनसामान्यांशी नाळ जोडलेले, तळागाळातील घटकांच्या विकासासाठी साठी झटणारे नेतृत्व हरपले. ग्रामीण भागाची नाडी माहित असणारे, सहकार चळवळीच्या माध्यमातून सक्रिय अशा आमदार कर्डीले यांनी राहुरी मतदार संघ आणि अहिल्या नगरच्या विकासाचा सदैव ध्यास घेतला. ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डीले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे, मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आमदार शिवाजीराव कर्डिले यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून श्रद्धाजंली वाहिली आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असून, त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख व संवेदनशील नेतृत्व हरपल्याची शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी जवळचा सहकारी गेल्याची भावना व्यक्त करत म्हटले की, विधिमंडळातील माझे सहकारी, राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, ज्येष्ठ नेते शिवाजीराव कर्डीले यांच्या आकस्मिक निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. नगर शहराजवळील बुऱ्हाणनगरच्या सरपंच पदापासून राजकारणाला सुरुवात करत त्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आमदार व मंत्रिपदापर्यंत झेप घेतली. कर्डीले कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचे बळ मिळो, हीच प्रार्थना.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. अतिशय सामान्य कार्यकर्ता म्हणून शिवाजीराव कर्डिले यांनी आपला राजकिय प्रवास सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी अनेक पदे भूषवली. नगर जिल्हात त्यांचे मोठे वलय होते. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाबद्दल कळताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी रूग्णालयाकडे धाव घेतली.

1 जून 1958 जन्म 1984-95 बुऱ्हानगर सरपंच 1990 बानेश्वर शैक्षणिक संस्था 1995 नगर नेवासा अपक्ष आमदार 1999 नगर नेवासा अपक्ष आमदार 2003-04 राज्य मंत्री, मत्स्य व बंदरे विकास 2004 राष्ट्रवादी नगर नेवासा आमदार 2007 ADCC संचालक 2008-9 ADCC चेअरमन 2009 नगर दक्षिण खासदार राष्ट्रवादी उमेदवारी पराभव 2009 भाजप राहुरी नगर पाथर्डी आमदार 2014 भाजप राहुरी नगर पाथर्डी आमदार 2019 भाजप राहुरी नगर पाथर्डी प्राजक्त तनपुरे यांच्याकडून पराभव 2024 भाजप राहुरी नगर पाथर्डी 2023 चेअरमन ADCC

Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक