AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ते फोटो तर…भोंदुबाबा खरात प्रकरणी केसरकरांचा खुलासा, त्या खळबळजनक आरोपांवर काय म्हणाले?

दीपक केसरकर यांचे शिक्षणखाते भोंदुबाबा अशोक खरात चालवत होता, असा खळबळजनक आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर आता दीपक केसरकर यांनी समोर येत स्पष्टीकरण दिले आहे.

ते फोटो तर...भोंदुबाबा खरात प्रकरणी केसरकरांचा खुलासा, त्या खळबळजनक आरोपांवर काय म्हणाले?
deepak kesarkar and sanjay raut and ashok kharatImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 21, 2026 | 4:34 PM
Share

Deepak Kesarkar : भोंदुबाबा अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या खरातचे अनेक राजकीय नेत्यांचे त्याच्यासोबत फोटो आहेत. विशेष म्हणजे काही नेतेमंडळी तर त्याचे आशीर्वाद घेतानाही या फोटोंमध्ये दिसत आहे. त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्याने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केलेले आहे, असा आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. त्यांनी दीपक केसरकर यांचे नाव घेत अशोक खरातप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर आता दीपक केसरकर यांनी समोर येत राऊतांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिले आहे. तसेच अशोक खरातसोबत जोडण्यात येत असलेल्या संबंधांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

संजय राऊत यांनी नेमका काय आरोप केला?

अशोक खरातचे प्रकरण समोर आल्यानंतर संजय राऊत यांनी सरकार तसेच सत्ताधारी पक्षातील खाही नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हे आरोप करताना त्यांनी दीपक केसरकर यांचे थेट नाव घेतले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना शिक्षण खात्यातील अनेक महत्त्वाच्या बदल्या, बढत्या, इतर कामं करताना हे अशोक खरात बाबा लक्ष घालायचे. अनेक अधिकाऱ्यांची बदली, बढती करण्यासाठी हे बाबा दीपक केसरकर यांना सांगायचे. ट्रायटन्ट हॉटेलमध्ये बोलवून ही सगळी कामे करून घेतली जायची. शिक्षण खातं हे खरात बाबाकडून चालवले जायचे, असा गंभीर स्वरुपाचा आरोप संजय राऊत यांनी केला.

दीपक केसरकरांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलं?

दीपक केसरकर यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. कॅप्टन खरात यांना ज्या गंभीर आरोपाखाली अटक झाली आहे, त्या कृत्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन न्यायालय योग्य तो निर्णय घेईल, असे केसरकर म्हणाले आहेत. तसेच कॅप्टन खरात यांच्याशी माझी ओळख केवळ राजकीय किंवा वैयक्तिक कारणातून नाही, तर सिन्नर येथील ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे झाली. या मंदिराच्या रस्त्यासाठी त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आमची भेट झाली होती, असेही केसरकर यांनी सांगितले. खरात यांचा ॲस्ट्रॉनॉमी (खगोलशास्त्र/ज्योतिषशास्त्र) मध्ये चांगला अभ्यास असल्याने माझ्यासारख्या अनेक लोकांची त्यांच्याशी केवळ त्या विषयापुरती ओळख आहे. समाज माध्यमांवर फिरत असलेले फोटो हे ईशानेश्वर मंदिराच्या कामाच्या संदर्भातील किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नातील आहेत. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या निमंत्रणावरून लग्नाला जाणे किंवा शुभेच्छा देणे हा सामाजिक शिष्टाचार आहे, असे सांगत त्यांनी या फोटोांचा वैयक्तिक प्रकरणांशी संबंध जोडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

संजय राऊतांच्या आरोपावर केसरकर काय म्हणाले?

संजय राऊत यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. कॅप्टन खरात कधीही माझ्या कार्यालयात आलेले नाहीत, त्यामुळे ते माझे विभाग चालवत होते असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्या कार्यकाळात शिक्षण आणि मराठी भाषा विभागात जे ऐतिहासिक निर्णय झाले, ते क्वचितच इतर कोणत्याही मंत्र्यांच्या काळात झाले असतील. त्यामुळे विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे चुकीचे आहे. केवळ फोटोंच्या आधारे कोणत्याही राजकीय व्यक्तीचा या प्रकरणाशी संबंध जोडून चुकीची प्रसिद्धी देऊ नये, असे केसरकर म्हणाले आहेत.

Follow Us
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या!लवकरच मोठा फेरबदल? प्रदेशाध्यक्ष...
राष्ट्रावादीतील हालचाली वाढल्या! लवकरच मोठा फेरबदल? प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षच...
मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
मोठी बातमी! मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा दावा; व्हायरल पोस्टमध्ये नेमकं काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय?
झारखंडमधील विद्यार्थांचं आंदोलन पेटलं! अभिजीत दीपकेंची भूमिका काय असणार?
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय
EMI भरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! RBI चा रेपो रेटवर मोठा निर्णय; तुमच्या खिशावर काय परिणाम?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला
दिल्लीत मोठ्या घडामोडी! किरण रिजिजू थेट राहुल गांधींच्या भेटीला; नेमकं काय शिजतंय?
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरे संतापले
दिलगिरी व्यक्त करुन विषय संपत नाही, त्याला... सुनील तटकरेंनी काँग्रेसला सुनावले खडेबोल
35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी..
Sanjay Raut | 35 पर्यंत आलं आणि कोर्ट उठलं...आम्हाला आश्चर्यच वाटलं; सुनावणीपूर्वी संजय राऊतांची मिश्किल टोलेबाजी!
मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; मोठा निर्णय होणार?
CJP | मोदी सरकारला हादरा दिल्यानंतर CJP ॲक्शन मोडमध्ये; अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी बैठक; मोठा निर्णय होणार?
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! खांदेपालटचा इशारा
उपमुख्यमंत्री शिंदेंचा ऑपरेशन क्लीन-अप सुरू! त्या मंत्र्यांना घरी पाठवणार? खांदेपालटचा इशारा
मन हेलावणारी बातमी! बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन
मन हेलावणारी बातमी! लगान ते गजनी... बॉलिवूडचा दमदार अभिनेता प्रदीप रावत यांचं निधन