AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cm Eknath Shinde : आम्हाला परत बोलवायचं असेल तर उद्धव ठाकरेंना भाजपशी बोलावं लागेल, दिपक केसरकरांनी थेटच बजावलं

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनीच केलेल्या मोठ्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले. राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयाला आली. आणि शिंदे गट आणि भाजपची युती होत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले.

Cm Eknath Shinde : आम्हाला परत बोलवायचं असेल तर उद्धव ठाकरेंना भाजपशी बोलावं लागेल, दिपक केसरकरांनी थेटच बजावलं
बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेलात तर धनुष्यबाणही तुमच्या कामाला येणार नाही, दीपक केसरकरांचा ठाकरेंना इशाराImage Credit source: tv9
| Updated on: Jul 07, 2022 | 5:08 PM
Share

मुंबई : गेल्या अडीच वर्षांपूर्वी शिवसेना (Shivsena) आणि भाजपचा (BJP) तीन दशकांचा संसार तुटला आणि राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशी तिघांची मिळून महाविकास आघाडी तयार झाली आणि सत्तेची नवी समीकरणं मांडली गेली. मात्र भाजपकडून या अडीच वर्षात आज सरकार पडेल, उद्या सरकार पडेल, दोन महिन्यांनी सरकार पडेल, चार दिवसांनी सरकार पडेल, पंधरा दिवसांनी सरकार पडेल, अशा अनेक तारखा देण्यात आल्या. मात्र तारीख खरी ठरायला अडीच वर्ष लागली. अडीच वर्षांनी मात्र शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीच केलेल्या मोठ्या बंडामुळे ठाकरे सरकार कोसळले. राज्यात नवी राजकीय समीकरणे उदयाला आली. आणि शिंदे गट आणि भाजपची युती होत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विराजमान झाले.

भाजपशी चर्चा करावी लागेल

अर्थात हा निर्णय ही सर्वांना आश्चर्यजनक वाटला होता मात्र आता या निर्णयानंतर आज दीपक केसरकरांना पत्रकाराने एक प्रश्न विचारला की उद्धव ठाकरेंनी तुम्हाला परत बोलावलं तर तुम्ही जाणार का? यावेळी दीपक केसरकरांनी ठाकरेंना थेट बजावला आहे की जर आम्हाला जर परत बोलवायचं असेल तर तुम्हाला आधी भाजपशीही चर्चा करावी लागेल.

केसरकर नेमकं काय म्हणाले?

दीपक केसरकर पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मुलगी पळून जाऊन लग्न केल्यानंतर त्यांना परत आणताना त्यांच्या कुटुंबप्रमुखाची ही परवानगी घ्यावी लागते. त्यांच्याशी चर्चा करावी लागते, आता भाजप आणि शिंदे गटाची युती झालेली आहे. सरकार स्थापन झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला परत बोलवायचं असेल तर उद्धव ठाकरे यांना भाजपशीही चर्चा करावी लागेल. फक्त आमच्याशी चर्चा करून चालणार नाही असं थेट केसरकारांनी ठाकरेंना बजावलं आहे.

तर दुसरीकडे ठाकरे समोरच्या अडचणी संपवायचं नाव घेत नाहीयेत. रोज एक मोठं नाव, रोज अनेक नगरसेवक, रोज अनेक जिल्हा पातळीवरचे, तालुका पातळीवरचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी हे ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाकडे जाताना दिसत आहेत. त्यातच आता राज्यात काही दिवसात बड्या महापालिकांच्या आणि अनेक पंचायत पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागत आहेत. अशाच शिवसेनेतून न थांबणारी गळती रोखणं ठाकरेंसाठी मोठं आव्हानात्मक होऊन बसले आहे. त्यामुळे आता केसरकरांच्या या वाक्यावर ठाकरेंची काय प्रतिक्रिया येते आणि ठाकरे केसरकरांनी बजावला आहे, तसं खरंच भाजपशी चर्चा करणार का? याही प्रश्नाचे उत्तर भविष्यकाळच देईल. मात्र सध्या तरी शिंदे गटाची बाजू अधिक मजबूत होत चालले.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.