AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉर्पोरेटची मुलं प्रेशर कुकरसारखी, बाहेरून गरम आतून नरम, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पुण्यातल्या विद्यार्थ्यांना काय दिला सल्ला?

आजकालची तरुण मुलं वेगाने प्रगती करत आहेत. मात्र भावनांचं नियोजन करणं, शांत संयमी राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे, असा सल्ला देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिला.

कॉर्पोरेटची मुलं प्रेशर कुकरसारखी, बाहेरून गरम आतून नरम, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पुण्यातल्या विद्यार्थ्यांना काय दिला सल्ला?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2023 | 4:42 PM
Share

अभिजित पोते, पुणे : कॉर्पोरेट क्षेत्रात (Corporate sector) काम करणारी मुलं प्रेशर कुकर सारखी असतात. बाहेरून अत्यंत गरम आणि आतून अतिशय नरम. मात्र मन शांत कसं ठेवायचं, हे आजच्या जगातील मुलांनी शिकून घ्यायला हवं, आपल्या देशातील प्राचीन ग्रंथांमध्ये यावर मोठी सामग्री उपलब्ध आहे. भारतातील ऋषी मुनींनी त्यांच्या ग्रंथातून आपल्याला नियोजन अर्थात मॅनेजमेंट शिकवलं आहे, असं वक्तव्य देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केलंय. पुण्यात सिम्बॉयसिस कॉलेजच्या विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत होते. खडकी येथील सिम्बॉयसिस कँपसमध्ये राजनाथ सिंह यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. सिम्बॉयसिससारख्या संस्थेने देशाच्या प्रगतीत मोलाचं योगदान दिलंय, असा उल्लेख राजनाथ सिंह यांनी आनर्जून केला.

‘शांत राहणं शिकलं पाहिजे’

राजनाथ सिंह म्हणाले, ‘ भारतात प्राचीन काळापासून नियोजन (mangement)या विषयावर अभ्यास सुरु आहे. आपल्या ऋषी मुनींनी देखिल हेच आपल्याला शिकवलं आहे. कोण कधी कामातून निवृत्ती घ्यायचं आणि कोण कसं वागायचं याचा उल्लेख देखील आपल्या ग्रंथात आला आहे. कार्पोरेट क्षेत्रातील मुलं मला प्रेशर कुकर सारखी वाटतात. आतून एकदम नरम आणि बाहेरून गरम. आपली ग्रंथसामग्री शांत कसं राहावं हे शिकवते. आपण सुखात आणि दुःखात समभाव राहिलो तरच आपण जिंकू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. आयुष्यात अडचणी येतच असतात पण त्यावर मात करुन आपल्याल पुढं जायला पाहिजे.

यश-अपयश कसं पचवायचं?

राजनाथ सिंह यांनी तरुणांना अत्यंत मोलाचं मार्गदर्शन केलं. ते म्हणाले, यश आणि अपयशात सारखं वागलं पाहिजे. प्रत्येक अक्षरात एक मंत्र आहे. प्रत्येक झाडांमध्ये एक औषध आहे. प्रत्येक माणसांमध्ये काहितिरी गुण आहेत. ते फक्त आपल्याला ओळखायला आले पाहिजे. राष्ट्र बनायला नियोजनाची खूप महत्त्वाची भूमिका असते. देशाच्या सामाजिक आणि आर्थिक वृद्धिंगात नियोजन (mgnt) हेच महत्त्वाचं असतं.

भारताची जागतिक स्तरावर ख्याती

जगातल्या सगळ्या मोठ्या संस्थांमध्ये भारतातील मुलं सर्वोच्च पदावर आहेत आणि आपल्या देशाचे नाव रोशन करत आहे. आपल्या देशाचे हे अमृत वर्ष आहे आणि या 75 वर्षात आपला देश खूप पुढे गेला आहे आणि पुढे जातच आहे. देशाला पुढे जायला तुमच्यासारख्या तरुणांची गरज आहे. भारत लवकरच जगातील सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढणारी अर्थव्यवस्था बनेल आणि लवकरच आपण जगात तीन नंबर वर असू. आधी आपल्या देशाच्या गोष्टींना जग मनावर घेत नसत आता आपल्या भारताने आंतरराष्ट्रीय कुठल्याही विषयावर भाष्य केलं तर पूर्ण जग कान देऊन ऐकतं. भारताने मांडलेला प्रत्येक मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार केला जातो. देशातील तरुण देशासह जगात एक नवी क्रांती घडवू शकतात, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.