उद्या दिल्लीत गेल्यावर माझ्यासोबत…अभिजीत दिपके यांच्या पोस्टने खळबळ
अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने उद्या शनिवारी दिल्लीत निदर्शने करण्याची घोषणा केल्याने सरकार हादरले आहे. सरकारने उद्या दिल्लीत नाकेबंदी केली आहे.

सीजेपीने उद्या राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर निवडणूक आयुक्तांनी राजीनामा द्यावा यामागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, रात्रीपासूनच दिल्लीतील इंटरनेट बंद केले आहे. अनेक मेट्रो स्थानके आणि रेल्वे गाड्या बंद केल्या आहेत.चारही बाजूंनी पोलिसांनी नाकेबंदी केल्याने आता उद्या दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलना संदर्भात आता संस्थापक अभिजीत दिपके यांनी रात्री एक पोस्ट करीत आपले मत व्यक्त केले आहे.
अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीने उद्या शनिवारी दिल्लीत निदर्शने करण्याची घोषणा केल्याने सरकारने या आधीचा अनुभव पाहाता तगडा बंदोबस्त केला आहे. त्यामुळे उद्या जंतरमंतर येथे नेमके काय घडणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. त्यातच आता सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट केली आहे.
येथे पाहा पोस्ट –
Lol they blocked the video I just posted.
Link: https://t.co/n1sg3KKHU0 https://t.co/nn2OZ4pY7P
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 9, 2026
अभिजीत दिपके यांचे ट्विट नेमके काय ?
Final call!
उद्या दिल्लीत गेल्यावर माझ्यासोबत काय होणार ते माहीत नाही
मला विमानतळावरुन जरी अटक केली तरी मी मागे हटणार नाही
आपल्याला आपले लोकतंत्र आणी लोकशाही वाचवायची आहे
आम्हाला पारदर्शक निवडणुका पाहिजे आहेत
ते ज्ञानेश कुमारच्या आणी एसआयआर स्कॅब केल्याशिवाय नाही होवु शकत नाही
ही देशाची लोकशाही वाचवण्याचा लढाई आहे
जास्तीत जास्त लोकांनी जंतर मंतरवर या आणी आम्हाला साथ द्या
आपल्याला शांततेत आंदोलन करायचे आहे
मी माझ्या देशावर प्रेम करतो म्हणुन अमेरिका सोडुन भारताता आलो आहे
कीती दिवल घाबरुन जगणाप आपण
जेलची भीती कोणाला दाखवताय
आम्ही शांत बसणार नाही
UAPA लावायचे आहे तरी लावा
मला अटक केली तरी तुम्ही लढा
आपला लढा थांबायला नको
हा आपल्या देशाचा लढा आहे
महात्मा गांधीना आपल्यावर गर्व होणार असे काम आपण करुयात
आपल्याला गांधीजींच्या रस्त्यावर चालायचे आहे.
