मोठी बातमी! अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर, थेट पुण्यातील नगरसेवकांना…

राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अनेक बदल सध्या बघायला मिळत आहे. महापालिकांच्या निवडणुका झाल्या असून महापाैरपदासाठी रस्साखेच बघायला मिळत आहे. यादरम्यान अजित पवार यांनी आपल्या नगरसेवकांना थेट सूचना दिल्या आहेत.

मोठी बातमी! अजित पवार अ‍ॅक्शन मोडवर, थेट पुण्यातील नगरसेवकांना...
Deputy Chief Minister Ajit Pawar
| Updated on: Jan 20, 2026 | 8:09 AM

राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचे मतदान झाले असून भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने अनेक महापालिकांवर एकहाती सत्ता मिळवली. राज्यात सत्तेत असलेले पक्ष अर्थात भापजा, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात अनेक ठिकाणी निवडणुका लढताना दिसले. महापालिकांच्या निवडणुकीत सर्वात जास्त जर कोणत्या महापालिकेची चर्चा असेल तर ती पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेची. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची साथ सोडून चक्क काका शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साथ दिली. थेट भाजपा आमदार महेश लांडगे आणि अजित पवार यांच्यात आरोप प्रत्यारोपाचे सत्रही रंगताना दिसले. दुसरीकडे पुण्यात भाजपाचे मंत्री मुरलीधर मोहोळ आणि अजित पवार यांच्यातही शीतयुद्ध रंगले. युतीचा धर्म पाळला जाईल आणि एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जाणार नसल्याचे अनेकदा सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात तसे काही होताना दिसले नाही.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्य निवडणुकीमध्ये मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामध्येच पक्षाची एकवेळा पिंपरी चिंचवडमध्ये तरी कामगिरी ठीक राहिली. मात्र, दादांना पुणेकरांनी साफ नाकारल्याचे निकालातून पुढे आले. पिंपरी चिंचवड महापालिकेतही भाजपा हाच मोठा पक्ष ठरला. 2017 लाही पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता होती. त्यावेळी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मोठे नेते निवडणुकीच्या अगोदर फोडले.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कामगिरी या निवडणुकीत नक्कीच चांगली राहिली नसून निराशाजनक राहिली आहे. यादरम्यान अजित पवार पुण्यातच मुक्काम ठोकून आहेत. अजित पवार यांच्याकडन सध्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांच्या निवडणुका घेतल्या जात आहेत. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा जिल्हा परिषद निवडणुका एकत्र लढवणार का? याबद्दल काहीच माहिती मिळू शकली नाही.

अजित पवार यांनी नुकताच पुणे महापालिकेत निवडून आलेल्या आपल्या नगरसेवकांना चांगलाच कानमंत्र दिला असून स्पष्ट शब्दात अजित पवार यांनी म्हटले की, पुणेकरांनी विरोधात बसण्याचा कौल दिला असून आपण आपली कामगिरी चोखपणे पार पाडले पाहिजे. नवनिर्वाचित नगरसेवकांनी महापालिकेच्या कारभाराचा पूर्ण अभ्यास करावा आणि पुणेकरांची बाजू प्रखरपणे महापालिकेच्या सभागृहात मांडावी, असे त्यांनी नगरसेवकांना सांगितले.