AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानी; शरद पवार यांना टाकलं मागे

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नवा ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. १२ जुलै २०२६ पर्यंत त्यांचा कार्यकाळ २४३० दिवसांवर पोहोचला असून, त्यांनी शरद पवारांना मागे टाकलं आहे. आता फडणवीस हे महाराष्ट्राचे तिसरे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री ठरले आहेत.

मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानी; शरद पवार यांना टाकलं मागे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवा विक्रम
| Updated on: Jul 13, 2026 | 8:30 AM
Share

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर एका महत्त्वाच्या विक्रमाची नोंद झाली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाच्या बाबतीत फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना मागे टाकत राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले आहे. 12 जुलै 2026 या तारखेपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा एकूण कार्यकाळ 2,430 दिवसांचा (सुमारे 6 वर्ष 7 महिने) झाला आहे. याच कालावधीसह, फडणवीस यांनी शरद पवार यांच्या 2,412 दिवसांच्या मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कार्यकाळाला मागे टाकलं आहे. फडणवीस यांचा सध्याचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ सुरू असल्याने त्यांच्या नावावरील हा विक्रम दिवसेंदिवस वाढत आहे.

फडणवीस आत्तापर्यंत 3 वेळा मुख्यमंत्री

देवेंद्र फडणवीस हे आतापर्यंत तीन वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांचा पहिला कार्यकाळ 2014 ते 2019 या कालावधीत सलग पाच वर्षांचा होता. 2019 साली त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; मात्र तो कार्यकाळ अवघ्या सहा दिवसांत संपुष्टात आला. त्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारली. 12 जुलै 2026 पर्यंत या तिसऱ्या कार्यकाळाला 585 दिवस पूर्ण झाले असून तो अद्याप सुरू आहे.

विशेष म्हणजे शरद पवार चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांना एकदाही सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नाही. त्यांच्या चारही कार्यकाळांचा शेवट विविध राजकीय आणि प्रशासकीय कारणांमुळे मुदतपूर्व झाला होता.

मुख्यमंत्रीपदाच्या एकूण कालावधीच्या यादीत दिवंगत वसंतराव नाईक हे ४,०९६ दिवसांसह अव्वल स्थानावर आहेत. त्यांच्या पाठोपाठ २,६८६ दिवसांसह विलासराव देशमुख दुसऱ्या स्थानावर आहेत. आता २,४३० दिवसांच्या कार्यकाळासह देवेंद्र फडणवीस तिसऱ्या स्थानावर पोहोचले असून शरद पवार २,४१२ दिवसांसह चौथ्या स्थानावर गेले आहेत.

महाराष्ट्रातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले नेते :

वसंतराव नाईक – ४,०९६ दिवस (११ वर्षे ७८ दिवस)

विलासराव देशमुख – २,६८६ दिवस (सुमारे ७ वर्षे १२९ दिवस)

देवेंद्र फडणवीस – २,४३० दिवस (सुमारे ६ वर्षे ७ महिने) (१२ जुलै २०२६ पर्यंत)

शरद पवार – २,४१२ दिवस (सुमारे ६ वर्षे २२१ दिवस)

या नव्या टप्प्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला असून त्यांचा विद्यमान कार्यकाळ सुरू असल्याने ही नोंद आगामी काळात आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.

Follow Us
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; कारण काय?
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला पुन्हा लांबणीवर; सुनावणी पुढे ढकलली! कारण काय?
सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? संविधान पायदळी तुडवल्याचा...
Solapur : सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीत मतांची चोरी? धैर्यशील मोहिते पाटलांचा खळबळजनक आरोप; संविधान पायदळी तुडवल्याचा दावा
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या...
सुप्रिया सुळे तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयाकडे रवाना; शरद पवारांच्या प्रकृतीबाबत दिली मोठी अपडेट!
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन
धारावीकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात! अदानी प्रकल्पाविरोधात मोठं आंदोलन, नेमक्या काय आहेत मागण्या?
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला..
10 कोटींच्या मागणीचा व्हिडिओ व्हायरल, देवराम लांडेंचा राष्ट्रवादीला रामराम!
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला
शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी सरकारचा पुढाकार; एकनाथ शिंदेंनी सांगितला खास संकल्प