AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो…फडणवीस यांचे विरोधकांना थेट आव्हान

राम सातपुते यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता पाच वर्ष राबतो. एकट्या मारकडवाडीत राम सातपुते यांनी २२ कोटीची कामे केली. त्यांना मारकवाडीत जास्त मते मिळाली. त्यानंतर गावातील लोकांना तुम्ही धमकावत आहात, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो...फडणवीस यांचे विरोधकांना थेट आव्हान
देवेंद्र फडणवीस
| Updated on: Dec 19, 2024 | 3:10 PM
Share

लोकसभेत फेक नरेटिव्ह करण्यात आले. परंतु विधानसभेत फेक नरेटिव्ह फॅक्टरी उद्धवस्त करण्याचे काम राज्यातील जनतेने केले. विधानसभा निवडणुकीत ६६.०५ टक्के मतदान झाले. त्यातील महायुतीला ५० टक्के मते मिळाली. इतिहासात इतकी मते कधी कोणाला मिळाली नाही. आम्ही तुमचे हे फेक नरेटिव्ही लोकासमोर उघड केले. मी मी आधुनिक अभिमन्यू, मला चक्रव्यूह भेदता येतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. त्यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा चांगलाच समाचार घेतला. विधानसभा निवडणुकीची आकडेवारी मांडत नाना पटोले यांना तुमची फेक नरेटिव्ह फॅक्टर आम्ही बंद केल्याचा टोला फडणवीस यांनी लगावला.

शरद पवार यांना थेट प्रश्न?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला सर्वात जास्त आश्चर्य वाटले शरद पवार साहेबांचे. पवार साहेबांनी कधी ईव्हीएमवर वक्तव्य केले नव्हते. परंतु आता त्यांनी ईव्हीएमबाबत धक्कादायक वक्तव्य केले. ते म्हणाले ईव्हीएममध्ये अशी सेटींग केली आहे की छोटी राज्य आम्ही जिंकू, मोठी राज्य तुम्हाला मिळणार. मग कर्नाटक काय छोटे राज्य आहे का? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला.

मारकडवाडीतील आंदोलनावरुन घेरले

देवेंद्र फडवणीस यांनी मारकडवाडी गावातील मतपत्रिकेवरुन मतदानाच्या आंदोलनावरुनही विरोधकांना उत्तर दिले. फडणवीस म्हणाले, २०१४ची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांना ५३३ मते आहेत. सदाभाऊ खोत यांना ६६४ मते आहेत. त्यानंतर लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये झाली. त्या निवडणुकीत रणजितसिंह निंबाळकर यांना ९५६ मते मिळाली. तर संजय मामा शिंदे यांना ३०० मते आहेत. सर्वच आकडेवारी माझ्याकडे आहे, असे त्यांनी म्हणाले.

मारकवाडीत राम सातपुते यांनी केलेल्या कामाचे उदाहरण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते म्हणाले, राम सातपुते यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता पाच वर्ष राबतो. एकट्या मारकडवाडीत राम सातपुते यांनी २२ कोटीची कामे केली. त्यांना मारकवाडीत जास्त मते मिळाली. त्यानंतर गावातील लोकांना तुम्ही धमकावत आहात. त्याबाबतची ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. ही कुठली लोकशाही आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. त्या गावातील लोकांना सांगितले, गावात घेण्यात आलेल्या मतपत्रिकेच्या मतदानावर पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाले पाहिजे. ही कोणती पद्धत आहे. ही दादागिरी लोकशाहीत खपवून घेतली जाणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले.

मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.